आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ambanis, Birlas, Mittals Join Race For Payment Bank Licences

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुकेश अंबानी, बिर्ला, बियाणी, महिंद्रा पेमेंट बँकेच्या शर्यतीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली, मुंबई - मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला समूह आणि फ्युचर समूह आता बँकेच्या कारभारात उतरणार आहेत. या तीनही कंपन्यांनी पेमेंट बँकेच्या परवान्यासाठी अर्ज केले आहेत. बँकिंग व्यवसायासाठी रिलायन्सने स्टेट बँक ऑफ इंडियाशी हातमिळवणी केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील बँकिंग सेवेचा विस्तार करण्यासाठी स्मॉल आणि पेमेंट बँक श्रेणीच्या माध्यमातून नवे परवाने देण्याचे जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेकडे यासाठी अर्ज करण्याची दोन फेब्रुवारी ही शेवटची तारीख होती. याशिवाय आदित्य बिर्ला समूहातील आयडिया सेल्युलर या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीसह बँकिंग कारभारात उतरण्याचा निर्णय घेतला आहे, तर किशोर बियाणी यांच्या फ्यूचर समूहानेही बँकेच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे.
आयडियामध्ये आदित्य बिर्ला करणार गुंतवणूक : आयडिया सेल्यूलरची सर्वात मोठी समभागधारक आदित्य बिर्ला नुवोने सांगितले, पेमेंट बँकेत त्यांची ५१ टक्के आणि उर्वरित हिस्सेदारी आयडियाकडे राहील. आयडियानंतर यातील हिस्सा ६० टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे.
पेमेंट बँक घेणार केवळ ठेवी
रिझर्व्ह बँकेने पेमेंट बँक नावाची आणखी एका श्रेणीचे मॉडेल तयार केले आहे. यात मोबाइल फोन कंपन्यांपासून ते सुपरमार्केट चालवणार्‍या कंपन्याही बँक उघडू शकतील. यासाठी किमान १०० कोटी रुपयांच्या भांडवलाची आवश्यकता लागणार आहे.
एअरटेल-कोटक महिंद्रा हातमिळवणी
भारती एअरटेलची सहयोगी एअरटेल एम कॉमर्स सर्व्हिसेस लिमिटेडद्वारे पेमेंट बँकेसाठी परवाना अर्ज केला आहे. यात कोटक महिंद्राची हिस्सेदारी १९.९० टक्के राहील.
शर्यत रंगणार
स्मॉल बँकेसाठी महिंद्रा, टपाल खाते, व्हिडिओकॉन, युसूफ अलींचा लुलू समूह, उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस आदींसह ११३ अर्ज आले असून ही शर्यत रंगणार आहे.
रिलायन्सबरोबर एसबीआय
रिलायन्स इंडस्ट्रीजने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भागीदारीत बँकिंग व्यवसाय करण्याची योजना आखली आहे. पेमेंट बँकेसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज प्रवर्तकाच्या भूमिकेत राहील, तर एसबीआयची हिस्सेदारी ३० टक्के राहील. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयबरोबर जर रिलायन्सला पेमेंट बँकेचा परवाना मिळाला, तर हे सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क म्हणून समोर येण्याची शक्यता आहे.
स्मॉल बँका देणार शेतकरी, लघु व्यावसायिकांना कर्ज
रिझर्व्ह बँकेच्या मते, सध्याच्या बँकेतर वित्तीय संस्था (एनबीएफसी), मायक्रोफायनान्स कंपन्याही निश्चित अटींच्या अधीन राहून परवान्यासाठी अर्ज करू शकतात. स्मॉल बँका प्रामुख्याने शेतकरी, लघु व्यावसायिक यांना कर्ज देतील. रिझर्व्ह बँकेच्या मते, छोट्या बँकांना ७५ टक्के कर्ज प्रामुख्याने प्राथमिक क्षेत्राला देण्याचे बंधन राहील. या बँका डेबिट तसेच क्रेडिट असे दोन्ही प्रकारचे कार्ड जारी करू शकतील. या बँकांत प्रारंभीच्या काळात प्रवर्तकांचा हिस्सा ४० टक्क्यांपर्यंत राहील. त्यानंतरच्या १२ वर्षांत ही हिस्सेदारी २६ टक्क्यांवर आणावी लागणार आहे.