आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cosmos Bank Became First Net Banking Facility Provider

नेट बँकिंग सुविधा देणारी \'कॉसमॉस\' ठरली देशातील पहिली सहकारी बँक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या निकषांची पुर्तता करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना आवश्यक असलेली नेट बँकिंग सुविधा देणारी देशातील पहिली सहकारी बँक होण्याचा मान कॉसमॉस बँकेने मिळाला आहे. याची माहिती प्रभारी अध्यक्ष कृष्‍णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बँकेच्या या सुविधेचे उदघाटन येत्या शुक्रवारी १८ जानेवारी रोजी रिझर्व्ह बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक मीना हेमचंद्र यांच्या हस्ते होणार आहे. श्री. गोयल म्हणाले की, सरकारी आणि खासगी बँकांशी स्पर्धा करताना नेट बँकिंग सुविधा देणे आवश्यक आहे. विशेषत: तरुण पिढी हे तंत्र वापरत असल्याने तो ग्राहक आमच्यापासून तोडला जाऊ नये यासाठी हा पुढाकार घेतला जातो आहे. सहा राज्यातील सर्व शाखात ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. एटीएममुळे कर्मचारी संख्येत कपात होईल अशी आमची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात संख्या वाढवावी लागली आहे.

वित्तीय सर्वसमावेशकता व्हावी यासाठी बचत गटांच्या माध्यमातून लोकांपर्यंत बँक सेवा नेण्याचे आमचे मोडेल सर्वात चांगले असून त्याद्वारे आम्ही व्यवसाय वाढवत आहोत असे नमूद करून ते म्हणाले की गडहिंग्लजची शिवाजी बँक, ओरिसाची राज्य सहकारी बँक आणि नाशिकची जनलक्ष्मी बँक विलीन करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. नुकत्याच झालेल्या संसद अधिवेशनात कर्ज वसुलीविषयक कायद्यात (सर्फेसी) सुधारणा झाली आहे. यामुळे बँकेला मालमत्ता जप्तीचे अधिकार मिळतील. त्याबाबत अधिसूचना जारी होताच आमचे सध्या असलेले अनुत्पादक कर्जाचे प्रमाण ४.७ टक्क्यांवरून दोन टक्के व्हावे असे प्रयत्न आहेत.