आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महागड्या कार : वाहन क्षेत्रातील कमाईचे साधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार कंपन्यांना सध्या खूपच कमी मार्जिनवर व्यवसाय करावा लागत आहे. कच्चा माल आणि मजुरीचे दर वाढल्याने उत्पादन प्रक्रिया महागली आहे. त्यामुळे अडचणीत आणखी भर पडली आहे. ग्राहकांची अपेक्षा मात्र कार स्वस्त मिळाव्यात अशी आहे. त्यामुळे ग्राहक घासाघीस करताना दिसून येताहेत. जेव्हा एखादा ग्राहक कार खरेदीसाठी वितरकाकडे जातो तेव्हा कार खरेदीवर किती सवलत मिळते किंवा काय गिफ्ट आॅफर आहे याची विचारणा करतो. सौदा न होण्यामागे ब-या च वेळा डिस्काउंट किंवा गिफ्ट हे कारण असते. मात्र, उत्पादकांसाठी हे छोटेसे डिस्काउंट किंवा गिफ्ट फारच महागात पडते.

डिस्काउंट संस्कृतीने मुख्य प्रवाहातील कार निर्मात्यांना सर्वाधिक प्रभावित केले आहे. प्रीमियम आणि कमी किमतीच्या कार निर्मात्यांनी यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. फोक्सवॅगन आणि बीएमडब्ल्यू या दोन जर्मन कार निर्मात्या कंपन्यांनी त्यांच्या ताज्या वार्षिक आकडेवारीत म्हटले आहे, जर आपण महागड्या गाड्या यशस्वीपणे उत्पादित करत असला तर आज वाहन क्षेत्रात हाच पैसे कमावण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे.
फोक्सवॅगनने 57 लाख कारची विक्री करत 3.1 अब्ज पौंडांची (सुमारे 255.78 अब्ज रुपये) कमाई केली. फोक्सवॅगनच्या मालकीचा लक्झरी ब्रँड आॅडीने 15 लाख वाहनांची विक्री करत 4.7 अब्ज पौंड (सुमारे 387.80 अब्ज रुपये) कमावले. आकडेवारीवरून लक्षात येते की, आॅडीने प्रत्येक कारमागे 3133 पौंडांचा (सुमारे 2.58 लाख रुपये) नफा कमावला, तर फोक्सवॅगनने कारमागे 543 पौंडांचा (सुमारे 44,800 रुपये) नफा कमावला. फोक्सवॅगनच्या वरिष्ठ अधिका-या ंच्या मते, त्याच्या समूहाला प्रीमियम ब्रँडच्या कार विक्रीतूनच 50 टक्के नफ मिळाला आहे. बीएमडब्ल्यूची कथाही अशीच आहे. या कंपनीने गेल्या वर्षात 16 लाख कारच्या विक्रीतून 4.38 अब्ज पौंडांची (सुमारे 361.39 अब्ज रुपये) कमाई केली. कंपनीने कारमागे 2622 पौंडांचा (2.16 लाख रुपये) नफा कमावला. कार जितकी महाग तितके नफ्याचे प्रमाण जास्त असे दिसून येते. फोक्सवॅगनच्या नफ्यात सर्वाधिक वाटा पोर्श कारचा होता. गेल्या आॅगस्टमध्येच ही कार फोक्सवॅगनच्या ताफ्यात सामील झाली. मात्र, 2012 च्या शेवटच्या पाच महिन्यांत पोर्शने 82 कोटी पौंड (सुमारे 6,765.82 कोटी रुपये) कमावले. वर्षभरात 1.40 लाख कारच्या विक्रीसह प्रति कार सरासरी नफा 11,700 पौंड (सुमारे 9.65 लाख रुपये) राहिला.
या आकड्यांचा सखोल अभ्यास केल्यास आॅटो उद्योगाकडून होत असलेल्या अथक प्रयत्नांची माहिती मिळते. जसे, मोठ्या रकमेची गुंतवणूक, मोठ्या प्रमाणात कर्मचारी ठेवणे, स्टील प्लांटपासून ते वितरकापर्यंत सर्वांना लाभदायी ठरेल अशी मागणी निर्माण करणे. हे सर्व कशासाठी, तर केवळ नफा कमावण्यासाठी. भले नफा कमी असेल, परंतु तोटा मात्र व्हायला नको.

लेखक ब्रिटनस्थित ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील पत्रकार आहेत.