आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूसाच्या उत्पादनात 12% वाढीचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चांगला पाऊस व लागवडीखालील क्षेत्रफळातील वाढीमुळे यंदाच्या हंगामात कापूस उत्पादनात 11.7 टक्क्यांनी वाढून 380 लाख गासड्यांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विद्यमान हंगामात 340 लाख गासड्या उत्पादन झाले आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या पुढील कापूस हंगामाध्ये 380 लाख गासड्यांपेक्षा कमी कापसाचे उत्पादन होण्याची शक्यता नाही, असे वस्त्रमंत्री काव्हुरू सांबाशिवा राव यांनी सांगितले. ऑक्टोबर ते सप्टेंबर असा कापूस हंगाम असतो.

कापूस उत्पादक राज्यांमध्ये झालेला चांगला पाऊस व लागवड क्षेत्रफळ वाढल्यामुळे उत्पादनात चांगली वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. देशात सर्वाधिक कापूस पिकवणार्‍या गुजरातमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे लागवडीखालील क्षेत्रफळात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

चालू हंगामामध्ये 100 लाख गासड्या कापून निर्यात झाली होती. पुढील हंगामामध्ये होणार्‍या निर्यातीबाबत कापूस सल्लागार मंडळ लवकरच निर्णय घेणार असल्याचे राव यांनी सांगितले. कापूस सल्लागार मंडळाने विद्यमान तसेच पुढील वर्षाचा अद्याप आढावा घेतलेला नाही. साधारणपणे मंडळाची कापूस उत्पादन, वापर, निर्यात आणि आयातीचा आढावा घेण्यासाठी कापूस मंडळाची प्रत्येक तिमाहीत बैठक होत असते परंतु यंदाच्या एप्रिलपासून ती झालेली नाही.