आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस लागवडीत होतेय झपाट्याने वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कापूस लागवडीखालील क्षेत्रच नव्हे तर उत्पादन, उत्पादकता, खप आणि निर्यातही झपाट्याने वाढत आहे. देशातील कापूस लागवडीखालील क्षेत्रफळ यंदाच्या वर्षात वाढून १२.६५ दशलक्ष हेक्टर्सवर गेले असून जागतिक पातळीवरील एकूण कापूस लागवडीखालील क्षेत्रात भारताचा वाटा ३७ टक्के असल्याची माहिती ‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष धीरेन शहा यांनी दिली. यंदा देशात ४०.५५ दशलक्ष गासड्या कापूस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षात ३५.५ दशलक्ष गासड्या कापूस उत्पादन झाले होते.

उत्पादनवाढीसाठी पंचसूत्री
जीएम तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सरकारच्या प्रोत्साहनजनक धोरणांमुळे गेल्या दशकभरात कापसाची उत्पादकता वाढण्यासाठी लक्षणीय मदत झाली आहे. परंतु आता बोलगार्ड २ राऊंडअप रेडी फ्लेक्स सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान, यांत्रिक शेती, सघन लागवड, वैज्ञानिक संशोधन या पंचसुत्रीसह काही प्रमुख गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्यचे मत शहा यांनी व्यक्त केले.