आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापसाचे उत्पादन घटणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विद्यमान वर्षातल्या पीक हंगामामध्ये कापसाचे 353.25 लाख गाठी उत्पादन होण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे. अगोदरच्या वर्षातल्या 273. 25 लाख गाठींच्या तुलनेत यंदा कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.

डिसेंबरच्या अंदाजानुसार 2012-13 च्या हंगामामध्ये 353.25 लाख गाठी कापूस उत्पादन होण्याचा अंदाज असोसिएशनचे अध्यक्ष धीरेन शेठ यांनी व्यक्त केला आहे; परंतु कापूस लागवडीखालील क्षेत्रफळ कमी झालेले असतानाही यंदाच्या वर्षी कापूस उत्पादन चांगले असल्याचे ते म्हणाले. 31 डिसेंबरपर्यत 102.50 लाख गाठी कापसाची आवक झाली आहे.

राज्यनिहाय पीक उत्पादन आकडेवारीनुसार चालू अ‍ार्थिक वर्षात गुजरात आणि महाराष्‍ट्रात प्रत्येकी 80 लाख गाठी कापूस उत्पादन होण्याची शक्यता आहे.

अन्य राज्यांमध्ये आंध्र प्रदेशातील कापूस उत्पादन अगोदरच्या वर्षातल्या 58 लाख गाठींवरून 2012 - 13 वर्षात 73 लाख गाठींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. हरियाणातील कापूस उत्पादन 22 लाख गाठी (27.50 लाख गाठी मागील वर्षात) आणि पंजाबमध्ये 15 लाख गाठी (18 लाख गाठी) उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
कॉटन असोसिएशन ऑ फ इंडियाने चालू वर्षात एकूण 418.46 लाख गाठी कापसाचा पुरवठा होऊन देशातील वापर अंदाजे 271 लाख गाठी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसे झाल्यास 147.46 लाख गाठी अतिरिक्त कापूस शिल्लक राहणार आहे. दक्षिण भारतात विद्युत पुरवठा खंडित होत असतानाही कापूस गिरण्या चांगली कामगिरी करीत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.