आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Country Will Be Roaming Free After October Says Kapil Sibal

ऑक्‍टोबरपर्यंत सरकार करणार देशभरात रोमिंग फ्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- देशभरातील मोबाईल धारकांसाठी खुषखबर आहे. मोफत रोमिंग कॉलची सुविधा येत्या ऑक्टोबरपूर्वी कार्यान्वित होईल, अशी माहिती दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी दिली आहे. सध्या 5 सर्कलमध्‍ये रोमिंग फ्री सुविधा सुरु करण्‍यात आली आहे. परंतु, ऑक्‍टोबरनंतर रोमिंग राहणार नाही.

भारत सरकारने इंटरनेटच्या नोंदणीसाठी नॅशनल इंटरनेट रजिस्ट्रीची आज सुरूवात केली. या एनआयआरचे उद्घाटन झाल्यानंतर कपिल सिब्बल पत्रकारांशी बोलत होते. त्‍यांनी सांगितले की, ट्रायने रोमिंग मोफत करण्यासाठी एक कन्सल्टेशन पेपर तयार केला आहे. त्यावर मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आणि सरकार आपापली मते आणि भूमिका मांडणार आहेत. त्यांनंतर ट्रायच्या शिफारसीनुसार सरकारला देशभरात रोमिंग फ्री करता येईल. ही प्रक्रीया ऑक्‍टोबरपूर्वीच व्‍हावी, यासाठी सरकारचे प्रयत्‍न आहेत, असे सिब्बल यांनी स्पष्ट केले.

सध्या ज्या सर्कलमध्ये एखाद्या मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीची सेवा नसेल तिथे आपल्या ग्राहकाला सेवा पुरवण्यासाठी त्या राज्यात सेवा पुरवणाऱ्या मोबाईल कंपनीला कनेक्टिंग शुल्क द्यावे लागते. अर्थातच त्याची वसुली ग्राहकांकडूनच होते. एका कंपनीने दुसऱ्या कंपनीकडून अशी शुल्क आकारणी केली नाही तर मोबाईल कंपन्याही त्याची वसुली ग्राहकांकडून करणार नाहीत.