आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Country's First Woman Bank Starts On The Eve Of The Indira Gandhi Birthaniversary

इंदिरा गांधींच्या जयंतीदिनी देशातील पहिली महिला बँक होणार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त देशातील पहिली महिला बँक सुरू होणार आहे. या बँकेत महिलांसह पुरुषांनाही खाते उघडता येणार आहे. मात्र, महिला खातेदारांना विविध प्रकारच्या विशेष सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. पुरुष खातेदारांना मात्र या सुविधा मिळणार नसल्याचे वित्त मंत्रालयाने स्पष्ट केले.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिला बँकेसाठी विशेष तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी मुंबईत महिला बँकेच्या पहिल्या शाखेचा शुभारंभ होणार आहे. त्याच वेळी देशातील इतर सहा शहरांतील शाखांचे लोकार्पण होणार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारची महिला बँक ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. याच आठवड्यात उषा नतसुब्रमण्यम यांची महिला बँकेच्या सीएमडीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी त्या पंजाब नॅशनल बँकेच्या कार्यकारी संचालक होत्या.
बँकिंग सचिव राजीव टकरू यांनी सांगितले, महिलांचे आर्थिक सशक्तीकरण हा या बँकेचा मुख्य उद्देश आहे. महिलांना कशा प्रकारे सशक्त करण्यात येणार यावर त्यांनी फारसे भाष्य केले नाही. मात्र, या बँकेत खाते उघडणा-या महिला खातेदारांना अनेक सुविधा देण्यात येणार असून पुरुष खातेदारांना त्या सुविधा मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वित्त मंत्रालयाच्या अधिका-याने सांगितले, पगार खाते उघडल्यानंतर मिळणा-या झीरो बॅलन्स, मोफत एटीएम कार्ड, मोफत चेकबुक आदी सुविधा तर महिला खातेदारांना मिळणार आहेतच. महिला बँकेसाठी 103 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला बँकेची वैशिष्ट्ये
० केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद
० महिलांसह पुरुषांनाही खाते उघडता येणार
० महिला खातेदारांना मिळणार विशेष सुविधा
० महिला तसेच पुरुष कर्मचा-यांची नियुक्ती.