आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पॅकेजिंग उद्योग बहरणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - जागतिक पातळीवरील पॅकेजिंग उद्योगात सध्या भारताचे स्थान सहाव्या क्रमांकावर असले तरी 2016 पर्यंत या उद्योगाची उलाढाल जवळपास 43.7 अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज भारतीय पॅकेजिंग संस्थेचे अध्यक्ष एस. के. रे यांनी व्यक्त केला आहे.बहुराष्‍ट्रीय कंपन्या, जहाज उद्योग, मालवाहतूक, प्रिंटिंग, प्लॅस्टिक यांसारख्या प्रत्येक क्षेत्राशी पॅकेजिंग उद्योगाचा जवळचा संबंध असल्याने देशातील पॅकेजिंग उद्योग पुढील चार वर्षांत जगातील चौथी सर्वात मोठी बाजारपेठ ठरेल, असेही रे म्हणाले. ‘आर्थिक वृद्धीसाठी पॅकेजिंग’ या संकल्पनेवर आधारित मुंबईत गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये 28 ते 31 जानेवारी या कालावधीत भरत असलेल्या ‘इंडियापॅक’ प्रदर्शनाची माहिती देताना ते बोलत होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन वाणिज्य
आणि उद्योग राज्यमंत्री डॉ. पुरंदेश्वरी यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनाबरोबरच ‘नव्या पिढीतल्या पॅकेजिंगमधील नवे कल’ या विषयावर हॉटेल लालामध्ये दोन दिवसांचा परिसंवाददेखील आयोजित करण्यात आला आहे.

भारतात प्रमाण कमी
पॅकेजिंगचा दरडोई वापर चीनमध्ये 20 किलो, तर जर्मनीमध्ये तो 42 किलो आहे; परंतु भारतात मात्र हे प्रमाण केवळ वार्षिक 4.3 किलो असून जागतिक प्रमाणाच्या तुलनेत ते अत्यंत कमी आहे. त्यामुळे इंडियापॅकसारख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून या क्षेत्राला जास्त हातभार लागण्यात मदत होऊ शकेल.