आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकियावर विश्वासार्हतेची मोहर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नोकिया, सॅमसंग आणि सोनी हे तीन ब्रॅँड यंदाच्या वर्षात देशातले सर्वात विश्वसनीय ब्रॅँड्स ठरले असल्याचे ब्रॅँड ट्रस्टच्या एका सर्वेक्षण अहवालामध्ये म्हटले. नोकियाने तर सलग तिस-या वर्षी आपले अव्वल स्थान कायम राखले असून सॅमसंग आणि सोनीच्या क्रमवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन स्थानांनी सुधारणा होऊन या ब्रॅँडने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे.

आलिशान मोटारींमध्ये प्रसिद्ध असलेल्या बीएमडब्ल्यूने ब्रॅँड्सच्या क्रमवारीत चौथे स्थान मिळवले आहे, परंतु गेली दोन वर्षे सलग दुसरा क्रमांक पटकावणा-या टाटाच्या क्रमवारीत तीन स्थानांनी घसरण होऊन विश्वसनीय ब्रॅँड्सच्या यादीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. गोदरेज, रिलायन्स अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत बजाज ब्रॅँड एक स्थान खाली घसरून आठव्या क्रमांकावर असून एअरटेलने आपले क्रमवारीतील दहावे स्थान अबाधित ठेवले आहे. एलजी हा भारतातील दहावा विश्वसनीय ब्रॅँड असून त्याच्या क्रमवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 7 क्रमांकांची सुधारणा झाली आहे.