आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रेडिट कार्ड : कथित समजांपासून सावध राहा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वित्तीय साधनांत क्रेडिट कार्ड हे आधुनिक काळातील सर्वात महत्त्वाचे उत्पादन आहे. त्याचा वापर करणार्‍या प्रत्येकाला त्याच्या कामाची पद्धत आणि त्याचे परिणाम यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड खरेदीच्या वेळी लोक अनेक ठिकाणी चौकशी करून, तुलना करून त्याची खरेदी करतात. मात्र, या कार्डच्या सुरक्षेच्या बाबींबाबत मात्र तेवढी काळजी घेतली जात नाही. क्रेडिट कार्डचा वापर करणारे कार्डच्या सुरक्षेबाबत फारसे दक्ष नसतात. ते त्याविषयी असणार्‍या दंतकथा, कथित समजांवर जास्त विश्वास ठेवतात. अशाच काही समज आणि दंतकथांविषयी जाणून घेऊया, यापासून आपण सावध राहायला हवे..

0माझा सीव्हीव्ही क्रमांक इतरांना माहिती नाही : आपला सीव्हीव्ही क्रमांक सुरक्षित राखला म्हणजे त्यांचे कार्ड सुरक्षित राहील, असा बहुतेकांचा समज असतो. त्यांनी पुन्हा याबाबत विचार करायला हवा. कारण काही संकेतस्थळे ऑनलाइन व्यवहाराच्या वेळी सीव्हीव्ही क्रमांक मागत नाहीत. हे अनिवार्यही नाही. कार्ड क्रमांक, एक्स्पायरी डेट आणि कार्डधारकाचे नाव नमूद केल्यानेही व्यवहार पूर्ण होऊ शकतो. ऑफलाइन व्यवहारांच्या वेळी कार्डच्या सुरक्षेसाठी सीव्हीव्ही क्रमांक खोडून टाकणे उत्तम. कार्ड स्वाइप करताना स्वत: तेथे हजर असणे आवश्यक समजावे. पेट्रोल पंपावर जेथे स्वाइपिंग मशीन थोडी दूर असते, तेथे समक्ष कार्ड स्वाइप करून घेणे केव्हाही उत्तम.

0 माझ्या क्रेडिट कार्डची नक्कल प्रत बनवता येत नाही : मॅग्नेटिक स्ट्रीप आधारित क्रेडिट कार्डच्या चुंबकीय पट्टीवर अनेक बाबी नमूद असतात. स्वाइप होताना या माहितीची खातरजमा केली जाते. या माहितीच्या आधारे आपल्या कार्डचे क्लोन तयार करता येते. म्हणजेच आपले कार्ड सुरक्षित नाही. याचप्रमाणे ईएमव्ही (युरो पे, मास्टरकार्ड आणि व्हिसा) चिपवर आधारित कार्ड जास्त सुरक्षित आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार बँका आता अशाच प्रकारचे कार्ड देत आहेत.

त्यामुळे आपल्या कार्डचे क्लोन किंवा नक्कल करता येत नाही हा समज मनातून काढून टाका.

0 माझा क्रमांक पिन, पासवर्ड कोणालाच माहिती नाही : क्रेडिट कार्डशी निगडित हा आणखी एक समज आहे. भारतीय संकेतस्थळावरून ऑनलाइन व्यवहारासाठी नाव, कार्ड क्रमांक आणि सीव्हीव्ही क्रमांकानंतर अंतिम ऑथरायझेशनसाठी सेक्युअर पिन क्रमांक नमूद करावा लागतो. व्यवहार जास्त सुरक्षित व्हावेत यासाठी रिझर्व्ह बँकेने नुकतेच ही तरतूद केली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावर मात्र अशी अट नाही. तेथे क्रेडिट कार्डसंबंधी इतर सर्व माहिती दिली तरी व्यवहार पूर्ण होतो.

0 कार्डमागे सही करणे महत्त्वाचे नाही : कार्डच्या मागील बाजूवर असणार्‍या स्वाक्षरीला पाहिजे तेवढे महत्त्व दिले जात नाही. काही जण कार्ड मागे स्वाक्षरीबाबत फारसे जागरूक नसतात. मात्र, कार्डच्या मागे सही नसेल तर ते कार्ड अवैध मानले जाते. कार्ड देणारे आणि व्यापारी यांच्यात करार असतो. जेव्हा व्यापारी कार्ड स्वाइप करेल तेव्हा तो कार्डमागील सही व बिलावरील सहीची खातरजमा करून घेईल. मात्र, बहुतेक व्यापारीही याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळेच कार्डधारक किंवा ग्राहक सहीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, सही न केलेले कार्ड हरवले आणि कोणी तरी ते स्वाइप केले तर अनेक अडचणी येऊ शकतात. मात्र, त्या कार्डवर तुमची स्वाक्षरी असेल आणि ते कोणीही स्वाइप केले तरी बिल देण्यास तुम्ही नकार देऊ शकता. त्या व्यापार्‍याने सहीची पडताळणी न केल्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे कार्डच्या मागे सही करणे अत्यंत आवश्यक आहे.

लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.
adhil.shetty@dainikbhaskargroup.com