आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Credit Card Loan Or Personal Loan , Which Are Best Opetion?

क्रेडिट कार्ड लोन की पर्सनल लोन, कोणता पर्याय उत्तम ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रेडिट कार्डचा वापर सोपा आहे. मात्र, या कार्डचे आणि त्याद्वारे खर्च केलेल्या पैशाचे व्यवस्थापन करणे अवघड असते. आपल्या खर्च करण्याच्या सवयीमुळे तसेच तांत्रिक माहितीच्या अभावाने अनेक कार्डधारकांना क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे शक्य होत नाही. या स्थितीवर मात करण्यासाठी नेमके काय करावे हे जाणून घेऊ...


*मूलभूत बाबी : काही बाबींची माहिती घेतल्याशिवाय कोणतेच काम सुरू करू नये, असे म्हणतात. क्रेडिट कार्डची वापरही याला अपवाद नाही. कार्डधारकाने वापरापूर्वी सर्व मूळ अटी समजावून घेतल्या पाहिजेत. त्यातील पारिभाषिक शब्द जसे, बिलिंग सायकल, मिनिमम अमाउंट ड्यू आणि ग्रेस पीरियड अशा शब्दांचे अर्थ समजावून घेतले पाहिजेत. या बाबी जाणून घेतल्याशिवाय खर्च तसेच परतफेडीची रक्कम याचे व्यवस्थापन साधता येत नाही. यातील जराशी चूक जास्त व्याजाच्या रूपाने केव्हाही समोर येऊ शकते.
*अविवेकी खरेदी टाळा : मॉल्स आणि ऑनलाइन शॉपिंगच्या वेळी ब-याचदा खरेदीवर नियंत्रण राहत नाही. खर्चावर नियंत्रण ठेवले तरच उधारी कमी होऊ शकते हे लक्षात ठेवा. खरेदीच्या वेळी आपले बजेट कायम लक्षात ठेवावे. बेहिशेबी खरेदी टाळावी.
*बिलिंग सायकल काळात खर्चाचा भरणा करा : क्रेडिट कार्डच्या बिलिंग सायकल किंवा उपलब्ध ग्रेस कालावधीच्या मर्यादेत केलेल्या खर्चाची रक्कम फेडा, त्यामुळे उधारी किंवा थकबाकी वाढणार नाही. यामुळे अनावश्यक क्रेडिट वाढणार नाही. व्याजवाढीचा अतिरिक्त खर्च टाळता येईल.
*खर्च ईएमआयद्वारे फेडा : क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या मोठ्या खर्चाची रक्कम मासिक हप्त्यात (ईएमआय) रूपांतरित करता येते. हा पर्याय कंझ्युमर लोनप्रमाणे असतो. यात कर्जाची रक्कम आणि व्याज एकत्रित करून त्याचे मासिक हप्त्यात रूपांतर करतात. कार्डधारक सहा ते 24 महिन्यांच्या आत याची परतफेड करू शकतो. खेरदीच्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत या रकमेचे ईएमआयमध्ये रूपांतर करता येते. मात्र, प्रत्येक खेरदीसाठी पर्याय उपल्ब्ध नाही. काही विशिष्ट रकमेच्या वरील खरेदीची रक्कम ईएमआयसाठी पात्र ठरते. काही वेळा विशिष्ट दुकाने, मॉल्समधून केलेली खरेदीच ईएमआयसाठी पात्र असते.
*बॅलन्स ट्रान्सफर : रोख रकमेची चणचण असल्यास बॅलन्स ट्रान्सफर हा पर्याय योग्य ठरतो. यात एका कार्डवरील थकबाकीची रक्कम दुस-या, परंतु कमी व्याज असलेल्या कार्डवर ट्रान्सफर करता येते. कमी व्याजाचा लाभ किंवा एकूण थकबाकी एकाच कार्डवर आणण्यासाठी हा पर्याय वापरला जातो.
जेव्हा एखाद्याची उधारी कमाल मर्यादा गाठेल, त्या वेळी त्याने सर्वच थकबाकीची परतफेड करणे उत्तम राहील. क्रेडिट कार्डच्या तुलनेत पर्सनल लोन कमी व्याजदरात मिळते. त्यातून ईएमआयच्या रकमेचे उत्तम व्यवस्थापन साधता येते.खर्चावर चांगले नियंत्रण राखत थकबाकी किंवा खर्च केलेल्या रकमेचा भरणा नियमितपणे केल्यास उधारीचे उत्तम व्यवस्थापन राखता येते. रोख रकमेचा ओघ सातत्याने राखण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर व्हायला हवा. आपण किती समजदारीने खर्च करता त्यावर सर्व काही अवलंबून आहे.


लेखक bankbazaar.com चे सीईओ आहेत.
adhil.shetty@dainikbhaskargroup.com