आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CROMA ने लॉन्च केला सर्वात स्वस्त विंडोज 8.1 OS असलेला \'2 in 1कॉम्पूटर\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - रिटेल क्षेत्रातील आघाडीची कंपनी क्रोमाने इंटेलसोबत हातमिळवणी करत दोन नवे विंडोज 8.1 टॅबलेट 'क्रोमा 1179 टॅबलेट आठ इंच' आणि 'क्रोमा 1177 टू इन वन 10.1' लॉन्च केला आहे. या टॅबलेटची किंमत अनुक्रमे 13,990 आणि 21,990 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. हे टॅब देशातील सर्वच क्रोमा स्टोअरमध्ये उपलब्ध असतील. सध्या कंपनी याच्या ऑनलाईन विक्रीसाठी ऑनलाईन पार्टनरच्या शोधात आहे.
हा भारतीय क्रोमाचा आता पर्यंतचा सर्वात स्वस्त विंडोज 8.1 वर चालणारा 2 इन 1 पीसी आहे. याला टॅबलेट आणि लॅपटॉप असे दोन्ही प्रकारे वापरता येऊ शकते. 10.1 इंचाची स्क्रीन असलेल्या क्रोमा 2 इन 1 मध्ये की बोर्ड जोडला जाऊ शकतो. लॉन्च झालेले हे दोन्ही डिव्हाईस इंटेलच्या अ‍ॅटोम Z3735D 1.33 GHz प्रोसेसरवर चालतात. विंडोज 7 चे मेनस्ट्रीम सपोर्ट जानेवारी 2015 पर्यंत बंद करण्यात येईल. त्यामुळे विंडोज 8.1 युजर्ससाठी नव्या आणि अत्यंत चांगल्या सुविधा देणारी ऑपरेटींग सिस्टीम ठरू शकते. क्रोमाचा हा नवा 2 इन 1 आणि 8 इंच टॅबलेट युजर्सकरिता एक चांगला पर्याय आहे.
पुढील स्लाईडवर पाहा दोन्ही गॅजेट्स बद्दल