आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्चे तेल चार वर्षांच्या नीचांकी स्तरावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल चार वर्षांच्या नीचांकी स्तरावर आले. ब्रेंट क्रूड शुक्रवारी बॅरलमागे ८८.११ डॉलरपर्यंत घसरले. डिसेंबर २०१० नंतरचा हा सर्वात कमी भाव आहे. ब्रेंट क्रूड तेल जूनमध्ये ११५.७१ डॉलर या उच्चांकी पातळीवर होते. तेव्हापासून कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे ३१ टक्के घसरण आली आहे. भारतीय बास्केटच्या क्रूडची किंमत ९ ऑक्टोबर रोजी बॅरलमागे ९०.५० डॉलर होती.

सबसिडीचा भार कमी होणार
जर २०१४-१५ मध्ये किमती सरासरी ४ डॉलरने घटल्या तर त्यामुळे भारताची व्यापारी तूट तीन अब्ज डॉलरने कमी होईल. गेल्या वर्षी व्यापारी तुटीमध्ये ७५ वाटा कच्च्या तेलाचा होता. घरगुती गॅस आणि रॉकेलवर देण्यात येणारे अनुदानही यामुळे कमी होईल. पेट्रोलियम सबसिडी यंदा ८५,४८० कोटी वरून घटून ६३,४२६ कोटींवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. सबसिडी कमी झाल्याने महसुली तूट कमी होईल.

पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल, महागाई कमी होईल
पेट्रोलच्या किमती नियंत्रणमुक्त आहेत. डिझेलच्या विक्रीवरही कंपन्यांना आता नफा होत आहे. यांच्या किमती घटू शकतात. महसुली तूट कमी झाल्याने महागाई घटण्याची शक्यता आहे. स्वस्त पेट्रोलियम उत्पादनांचा महागाईवर इतर परिणाम होईल तो वेगळा.

आर्थिक वाढीला गती
भारतीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती एक डॉलरने उतरल्यास आयात बिल ६००० कोटींची कपात होते, असा अंदाज आहे. क्रूड १० डॉलरने स्वस्त झाल्यास जीडीपी ०.५ टक्क्यांनी वाढू शकतो.

भारताला फायदाच फायदा
भारतात कच्च्या तेलाचे दैनिक उत्पादन ९.९ लाख बॅरल आणि खप ३६.२ लाख बॅरल आहे. अशा रीतीने आपल्या गरजेची २५ टक्के पूर्तताच आपल्या स्रोताद्वारे पूर्ण होते. बाकी आयात करावे लागते. भारताच्या एकूण आयातीत क्रूडचा वाटा ३७ टक्के आहे. क्रूडच्या खपात अमेरिका, चीन आणि जपाननंतर भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

कंपन्यांनाही फायदा
तेल उत्पादक कंपन्यांच्या नफ्यातील एक हिस्सा इंडियन ऑइलसारख्या विपणन कंपन्यांना जातो. तो कमी होईल. पॉलिस्टर उत्पादने स्वस्त होतील. पॉलिस्टर प्युरिफाइड टेरिथॅलिक अ‍ॅसिड (पीटीए)पासून तयार होते आणि पीटीए क्रूडपासून बनते. रिलायन्स इंडस्ट्रीज पीटीए तयार करणारी जगातील आठवी सर्वात मोठी कंपनी आहे.

घसरणीची कारणे
मागणीत घट
जर्मनीची निर्यात गेल्या साडेपाच वर्षांच्या नीचांकी स्तरावर आहे. जपान आणि फ्रान्समध्येही औद्योगिक उत्पादन घसरत आहे. क्रूड खप असणा-या दुस-या सर्वात मोठ्या देशात चीनमध्ये विकास दर ७.५ टक्के या अंदाजापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
पुरवठा जास्त
अमेरिकेत २००५ मध्ये गरजेपेक्षा ६० टक्के कच्चे तेल आयात व्हायचे, आता केवळ ३० टक्के. सुमारे ३० वर्षांनंतर त्यांनी निर्यातीला सुरुवात केली. अमेरिकेशिवाय लिबिया, इराण, इराक आणि नायजेरियानेही उत्पादन वाढवले आहे.

घसरण राहणार
ओपेकच्या १२ देशांपैकी सात उत्पादन घटवण्याच्या बाजूने नाहीत. ब्राझील, रशिया, डेन्मार्कमध्ये नव्या साठ्यांचा शोध लागला आहे. रशियातील शेल ऑइलचा साठा अमेरिकेपेक्षा मोठा आहे. तज्ज्ञांच्या मते यातील उत्पादन सुरू झाल्यास क्रूड ६० डॉलरपर्यंत घसरू शकते.
* या वेळी कंपनीने झेडएक्स- १४ आर आणि झेड-८०० या दोन बाइक सादर केल्या.
* झेडएक्स- १४ आर ही १४०० सीसीची असून तिची किंमत १८.९५ लाख रुपये आहे
* झेड-८०० ही ८०० सीसीची असून तिची किंमत ९.१५ लाख रुपये (एक्स शो-रूम, चेन्नई) आहे.
इंडिया कावासाकी मोटार कंपनीने चेन्नई येथे स्पोर्टी बाइक सादर केली. त्या वेळी कंपनीचे उपसंचालक शिगेटो निशिकावा.