आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कच्चे तेल २० डॉलरवर - सिटी ग्रुप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरणीची शक्यता आहे. सिटी ग्रुपच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालानुसार गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ तात्पुरती आहे. येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमती पिंपामागे २० डॉलरपर्यंत खाली येऊ शकतात. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या २०१५ साठीच्या किमतीतही घट व्यक्त केली आहे.

सिटी ग्रुपचे कमोडिटी रिसर्च हेड एडवर्ड मोर्स यांच्या मते, जागतिक स्तरावर मागणी कमी असतानाही मागील आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली. अमेरिकेतील क्रूड तेलाचे उत्पादन अद्यापही वाढत आहे. त्याचबरोबर ब्राझील आणि रशियातील क्रूडच्या उत्पादनात वाढ होत आहे, तर सौदी अरेबिया, इराक आणि इराण बाजारपेठेतील आपला हिस्सा वाचवण्यासाठी आशियातील ग्राहकांसाठी सवलत देत आहे. या सर्व संकेतांमुळे क्रूड तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण येण्याची शक्यता आहे. मोर्स यांच्या मते, २०१५ च्या तिस-या तिमाहीपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता नाही. त्यामुळे सध्या पिंपामागे ५२ ते ५३ डॉलरवर असणारे कच्चे तेल पिंपामागे २० डॉलरपर्यंत येण्याची शक्यता आहे.

दुस-यांदा घटवला अंदाज
सिटी ग्रुपने यंदा दुस-यांदा कच्च्या तेलाच्या किमतीच्या अंदाजात घट केली आहे. अहवालानुसार कच्च्या तेलाची सरासरी किमती पिंपामागे ४५ ते ५५ डॉलरदरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर तेल क्षेत्रातील गुंतवणूक घटल्याने चौथ्या तिमाहीत कच्चे तेल पिंपामागे ७५ डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.