आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालू खात्यातील तूट घटणार - राघुराम राजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चलन बाजारपेठेत स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त करतानाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी चालू खात्याची तूट विद्यमान आर्थिक वर्षात अंदाजाच्या तुलनेत बरीच कमी म्हणजे 56 अब्ज डॉलरच्या आसपास राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
सोने आयातीला पायबंद घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना लक्षात घेता यंदाच्या चालू खात्यातील तूट जीडीपीच्या तुलनेत तीन टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे 56 अब्ज डॉलर आणि मागील वर्षाच्या तुलनेत 32 अब्ज डॉलरने कमी असेल, असे राजन यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले. विदेशी चलनाची आवक आणि जावक यातील फरक म्हणून ओळखली जाणारी चालू खात्यातील तूट मागील आर्थिक वर्षात जीडीपीच्या तुलनेत 4.8 टक्के किंवा 88.2 अब्ज डॉलर इतक्या कमाल पातळीवर गेली होती.
निर्यातीत झालेली सुधारणा आणि सोने
आयातीत घसरण झाल्यानंतर अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी चालू खात्यातील तुटीचा घटता अंदाज व्यक्त करताना ती 60 अब्ज डॉलरच्या आसपास राहण्याचा अंदाज नंतर व्यक्त केला होता. रुपयाच्या मूल्यात अलीकडे झालेल्या घसरणीसाठीचा विचार करता विदेशी चलन बाजारात चढ-उतार होण्यासाठी कोणतेही ठोस असे कारण नसल्याचे मत राजन यांनी व्यक्त केले.
महागाई चिंताजनक : अन्नधान्याची महागाई हा चिंतेचा विषय असल्याचेही रघुराम राजन म्हणाले. मात्र, नवीन पिके बाजारात आल्यानंतर ही महागाई ब-याच प्रमाणात आटोक्यात येणार असल्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. आगामी पतधोरणाचा निर्णय हा महागाईच्या निर्देशांकावरच अवलंबून असल्याचेही राजन म्हणाले.