आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Current Financial Economical Development Rate 5 To 5.30 Per P.Chidambaram

चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकासदर पाच ते साडेपाच टक्क्यांवर राहिल - पी. चिदंबरम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची फळे आता मिळायला लागली असून त्या आधारे आठ टक्के आर्थिक विकासाचे लक्ष्य साध्य करता येण्यासारखे आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकासदर पाच ते साडेपाच टक्क्यांवर जाईल असा विश्वास वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘बॅन्कॉन’ परिषदेत बोलताना व्यक्त केला.
जाणूनबुजून कर्ज थकवणा-या ग्राहकांच्या विरोधात बॅँकांनी कठोर भूमिका घेण्याची गरज आहे पण त्याचवेळी आर्थिक मरगळीमुळे पिचलेल्या कर्जदारांबद्दल मात्र ती ठेवता कामा नये, असे मत अर्थमंत्री चिदंबरम यांनी ‘इंडियन बॅँक्स असोसिएशन’ने आयोजित केलेल्या परिषदेत बॅँकांचे प्रमुख आणि अर्थतज्ज्ञांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. महागाई विशेष करून अन्नधान्याच्या वाढत असलेल्या किमती हे सरकार समोरचे आव्हान कायम राहणार असल्याचे सांगून चिदंबरम पुढे म्हणाले, सरकारने केलेल्या उपाययोजनांची चांगली फळे दृष्टिपथात येऊ लागली असून अर्थव्यवस्थेला उभारी येत आहे.