आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढत्या वीज बिलामुळे ग्राहकांचा स्टार रेटेड एसीकडे ओढा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वाढत्या वीज बिलामुळे वातानुकूलित यंत्रे (एसी) बनवणा-या कंपन्या यंदा इन्व्हर्टर एसी आणि चार तसेच पाच तारांकित एसी सेगमेंटवर डाव खेळण्याच्या तयारीत आहेत. जास्त पैसे खर्च करून चांगल्या तंत्राचे व वीज बचत करणारे एसी खरेदीसाठी भारतीय ग्राहकांची तयारी असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. दक्षिण भारतात नुकत्याच संपलेल्या हंगामात या कंपन्यांच्या इन्व्हर्टर एसीच्या विक्रीत दुप्पट वाढ दिसून आली. या हंगामात चार ते पाच तारांकित एसीच्या विक्रीत 25 ते 30 टक्के वाढ दिसून येईल असा कंपन्यांचा दावा आहे.


एलजी इंडियाचे प्रमुख (कॉर्पोरेट मार्केटिंग) संजय चितकारा यांनी सांगितले, यंदाचा कडक उन्हाळा लक्षात घेता एसीच्या विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मागील दोन आठवड्यांत हाय एंड एसीच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली आहे.


सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष (कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स) महेश कृष्णन यांनी सांगितले, सॅमसंग एअर कंडिशनरच्या जोरावर आम्ही यंदा स्पिल्ट एसीच्या विक्रीत 50 टक्के वाढ नोंदवण्याच्या तयारीत आहोत. गेल्या काही वर्षांत तारांकित एसीच्या मागणीत वाढ झाली आहे. या मानकांनुसार जास्त स्टार असणा-या एसीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. जास्त तारांकित एसीच्या विक्रीत लक्षणीय वाढ दिसून आली. यंदा एकूण एसीच्या विक्रीत चार आणि पाच स्टार असणा-या एसीचा वाटा 25 ते 30 टक्के राहील.


कॅरिअर मायडियाचे उपाध्यक्ष (विक्री) संजय महाजन यांनी सांगितले, गेल्या वर्षी बीईई लेबलिंगमुळे एसीच्या किमतीत वाढ झाली होती. त्यामुळे विक्रीवर परिणाम झाला होता. यंदा मात्र विक्री स्थिर आहे आणि जास्त स्टारच्या एसीची मागणी ग्राहकांकडून होत आहे. त्यामुळे या एसीच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे.


मोठी अपेक्षा
यंदा चार तसेच पाच स्टार रेटिंग असलेल्या एसीला मोठी मागणी आहे. त्यामुळे जास्त तारांकित एसीचा एकूण विक्रीतील वाटा 25 टक्के राहील. यंदा इन्व्हर्टर एसीकडून विक्रीबाबत मोठ्या अपेक्षा आहेत. कारण ग्राहकांचा या सेगमेंटकडे कल वाढत असल्याचे सॅमसंग, एलजी आणि कॅरिअर कंपन्यांनी सांगितले.