आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याज कमी करा : बँकर्सनी घातले रिझर्व्ह बँकेकडे साकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महागाईचे शुक्लकाष्ठ मागे लागलेले असले तरीदेखील आता रिझर्व्ह बँकेने आर्थिक विकासाची जास्त कास धरून रेपो रेट आणि कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये 0.5 टक्क्यांनी कपात करावी, असे ठाम मत बॅँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिका-या च्या बैठकीत व्यक्त केले.
ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या पतधोरणात तसेच आपल्या मध्य तिमाही पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर डॉ. दुव्वुरी सुब्बाराव यांनी जानेवारी महिन्यात जाहीर होणा-या पतधोरणामध्ये व्याजदर कमी करण्याचे संकेत दिले होते.

रेपो दर कमी करावा
महागाईची चिंता कायम असली तरी आर्थिक विकासाची चिंता त्यापेक्षा जास्त आहे. सध्याच्या घडीला महागाईशी निगडित गोष्टी समजण्यासारख्या असल्या तरीही आर्थिक विकास होण्याच्या दृष्टीने व्याजदरात कपात करावी, अशी आमची रिझर्व्ह बँकेकडे शिफारस आहे. त्यामुळे 29 जानेवारीला जाहीर होणा-या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने रेपो तसेच सीआरआर या दोन्ही व्याजदरांत कपात करावी, अशी मागणी बँकांनी केली आहे.
आदित्य पुरी, व्यवस्थापकीय संचालक, एचडीएफसी बँक

बँकांची चिंता
औद्योगिक उत्पादनाची नकारात्मक कामगिरी, डिसेंबरमध्ये महागाईचा दर घसरून तीन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. त्यामुळे 29 जानेवारीला व्याजदर कमी होण्याच्या भांडवल बाजारापासून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत बँकांनी ठेवीतील मंदावलेली वाढ आणि कर्ज उचलण्याचे घटलेले प्रमाण याविषयी चिंता व्यक्त केली. ठेवीतील संथ वाढ ही बँकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. दुस-या बाजूला कर्जवृद्धीही संथपणे होत आहे. बुडीत मालमत्तेच्या वाढत्या प्रमाणाबाबतदेखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे.