आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा ‘घराला घरपण’ देणार्‍या डीएसकेंचे ‘घर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराला घरपण देणारी माणसे अशी ओळख असणारे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांनी स्वत:च्या घराचे घरपण अत्यंत कलात्मक पद्धतीने जपले आहे. हिरवागार डोंगर, खळखळणारे झरे आणि डोळ्यांना सुखद अनुभूती देणार्‍या झाडा झुडपांच्या सानिध्यात साकारलेले डीएसकेंचे घर प्रत्यक्ष स्वप्ननगरी असल्याचे भासते. तब्बल 40 हजार पुणेकरांना हक्काचे घर दिल्यानंतर त्यांनी बांधलेल्या स्वत:च्या घरातील कोपरा न कोपरा वैविध्यपूर्ण आहे.जगातील विविध भागातून संग्रहित केलेल्या वस्तूमुळे त्यांचे घर पुण्याची नवी ओळख ठरत आहे.

पुण्यातील दिपक कुलकर्णी मराठी उद्योजकामधील मानाचे नाव. सर्वसामान्य व्यक्तीपासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत अनेकांचे घराचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवले. पुणे, मुंबई आणि नाशकातच नव्हे तर सातासमुद्रापार अमेरिका आणि सिंगापूरमध्ये त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. दुसर्‍यांच्या घराला घरपण देणार्‍या डिएसकेनी स्वत:चे घर उभारताना नाविण्य जपण्याचा प्रयत्न केला. 10 वर्षाच्या परिश्रमाने त्यांनी डोंगराच्या कुशीत तब्बल एक एकरावर स्वप्ननगरी उभारली आहे.