आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Datawind Launches Aakash Tablet With SIM Facility

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6000 हजारातील या टॅबमध्ये सिम कार्डही वापरता येईल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात स्वस्त टॅब्लेट 'आकाश'ची निर्मीती करणा-या डाटाविंडने आता सिम कार्डचा वापर करता येईल असा टॅब्लेट उपलब्ध करून दिला आहे. डाटाविंडने सादर केलेल्या या टॅब्लेटची किंमत रु. 5,999/- आहे. सध्या केवळ एका वेब पोर्टलद्वारेच त्याची खरेदी करता येणार आहे.

डाटाविंड यूबीस्लेट 7C+ Edge असे या टॅब्लेटचे नाव असून त्याचा डिस्प्ले आकार सात इंचा एवढा आहे. त्याचे रिझोल्युशन 800x480 आहे. या टॅबला व्हिडिओ चॅट करण्यासाठी पुढील बाजूस व्हीजीए कॅमेरा देण्यात आला आहे.