आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Datsun Go Car Will Launch In India; Mileage Will Be 20 Kilometer

निस्सानची \'डॅटसन गो\' लॉन्च; किंमत 3.12 लाख, एक लिटरमध्ये धावेल 20 किलोमीटर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जापानची कार निर्माता कंपनी 'निस्सान'ने आपली बहुचर्चित कार 'डॅटसन गो' भारतात लॉन्च केली आहे. दिल्लीतील एक्सशो रुममध्ये 'डॅटसन गो'ची किंमत 3.12 लाखापासून 3.70 लाख रुपये आहे. मारुती सुझुकीची सर्वाधिक खप असलेली ऑल्टो कारला 'डॅटसन गो' जबरदस्त आव्हान देण्याची शक्यता आहे.

'डॅटसन गो'मध्ये 1200 सीसीचे पेट्रोल इंजिन असून 'मायक्रा'च्या धर्तीवर या कारची निर्मिती करण्‍यात आली आहे.

निस्सानने 'डॅटसन गो' या कारला 'पहिली कार' म्हणून संबोधले आहे. पहिलांदा कार खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी या कारची निर्मिती करण्‍यात आली आहे. 'डॅटसन गो' कार एक लिटर पेट्रोलमध्ये 20 किलोमीटरचा मायलेज देईल, असा कंपनीने दावा केला आहे. याशिवाय कारमध्ये अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहे. आपला मोबाइल कारशी कनेक्ट करून आरामदायी कारमध्ये बसून आवडत्या म्युझिकचा आनंद लूटता येईल.

'डॅटसन गो' भारतीय बाजारात शेर्वले स्पार्क, मारुती सेलेरियो, मारूती ऑल्टो आणि हुंडाइची i10 सारख्या कारला आव्हान देण्याची शक्यता नाकारता येत नाही. सगळ्यात आधी 'डॅटसन गो' कारला ऑटो एक्सपो 2014 मध्ये सादर करण्यात आले होते.