(फोटोः Datsun Go+ लॉंन्च करताना निसान मोटर इंडिया प्रा.लि.चे एमडी अरुण मल्होत्रा, डटसनचे ग्लोबल हेड विनसेंट गोबी )नवी दिल्ली- जपानी कार कंपनी Nissan ने आली दुसरी कार Datsun Go+ भारतात लॉन्च केली आहे. एमपीव्ही सेगमेंटमधील Datsun Go+ हे एक शानदार मॉडेल आहे. या कारची मुंबईतील एक्स शोरूम किंमत 3 लाख 80 ते 4 लाख 60 हजार रुपये आहे. Datsun Go+ ही एक फॅमिली वॅगन कार आहे. Datsun Go च्या प्लॅटफॉर्मवर या कारची निर्मिती करण्यात आली आहे.
दोन एक्स्ट्रा सीटचे ऑप्शन...Datsun Go+ या कारमध्ये 5 सीटसोबत मागील बाजूस दोन 2 सीटचे ऑप्शन देण्यात आले आहे. 7 सीटर असूनही कंपनीने या कारची लांबी 4 मीटर पेक्षाही कमी ठेवली आहे. लूक आणि स्टाइलमध्ये Datsun Go सारखीच आहे. Go+ मध्ये 1.2 लीटरचे पेट्रोल इंजिन असून 67 बीएचपी पॉवर आहे.
20 किलोमीटरचे मायलेज...Datsun Go+ ही कार एक लिटर पेट्रोलमध्ये 20 किलोमीटरचा मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. ही कार 'मारुती एर्टिगा' आणि '
होंडा मोबिलियो'ला टक्कर देण्याची शक्यता आहे.
चार व्हेरिएंट लॉन्च....गो+ डीः 3.79 लाख रुपये
गो+ डी1: 3.82 लाख रुपये
गो+ ए - 4.15 लाख रुपये
गो+ टी - 4.61 लाख रुपये
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, Datsun Go+ मधील इंटीरिअर...