आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dattatreya Aambulkar Article About HR, Divya Marathi

‘एचआर’चे वाढते महत्त्व आणि माहात्म्य!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘प्राइस वॉटर कूपर’ म्हणजेच ‘पीडब्ल्यूसी’च्या 16व्या वार्षिक सर्वेक्षणात भारतीय कंपन्यांच्या मुख्याधिकार्‍यांनी विशेष आशावाद प्रदर्शित करतानाच कंपन्यांच्या यापुढील व्यावसायिक व वास्तविक विकास आणि वृद्धीसाठी ‘एचआर’ विभागाचे महत्त्व आणि माहात्म्य पुन्हा आणि नव्या संदर्भात अधोरेखित केले आहे. याच सर्वेक्षणात ‘एचआर’ने जुनी व परंपरागत भूमिका बाजूला सारून व्यवसाय आणि व्यवस्थापनातील नेतृत्वाशी अधिक एकजिनसी होण्याची अपेक्षा, पण प्रामुख्याने व्यक्त करण्यात आली आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 73 मुख्याधिकार्‍यांपैकी अधिकांश म्हणजेच 81 टक्के मुख्याधिकार्‍यांनी नजिकच्या भविष्यात कौशल्याची चणचण ही सर्वात मोठी व्यावसायिक समस्या राहील असे प्रांजळपणे मान्य केले आहे. या प्रमुख मुद्द्याशिवाय भारतीय मुख्याधिकार्‍यांनी या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जे मुद्दे प्रामुख्याने मांडलेत ते पुढीलप्रमाणे.

व्यावसायिक वाढ :
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 63 टक्के मुख्याधिकार्‍यांनी 2014 मध्ये त्यांची व्यावसायिक वाढ होईलच असा ठाम विश्वास व्यक्त केला असून, सुमारे अर्ध्या म्हणजेच 51 टक्के प्रतिसाद देणार्‍यांनी त्यांना नव्याने मनुष्यबळाची आवश्यकता राहील. याचाच अर्थ म्हणजे प्रमुख भारतीय कंपन्यांमध्ये आगामी वर्षभरात व्यवसायवाढीच्या जोडीलाच विशिष्ट कौशल्यप्राप्त कर्मचार्‍यांची निवड आणि वाढीला पण प्राधान्य देण्यात येणार असल्याने त्यासंदर्भात मनुष्यबळ विकास विभागाची भूमिका आणि योगदान अर्थातच महत्त्वाची राहणार आहे. मुख्य म्हणजे कंपन्यामधील कर्मचार्‍यांची ही नियोजित वा प्रस्तावित वाढ ही केवळ कर्मचार्‍यांची संख्या वाढविणे एवढ्यापुरतीच मर्यादित नसून, ही वाढ ‘गुणात्मक’ असल्यावर पण प्रामुख्याने भर देण्यात येणार आहे.

कार्य-संस्कृतीतील बदल :
जागतिकीकरणाच्या जोडीलाच वाढती व्यावसायिक व व्यवस्थापकीय गरज म्हणून आज भारतीय, मुख्याधिकारी विविध कंपन्यांमधून व विविध कार्य शैलीच्या व विविध प्रकारच्या कार्यशैलीने काम करणार्‍या कर्मचार्‍यांची निवड करण्यावर स्वाभाविकपणे भर देण्यात येतो. यासंदर्भात नव्याने येणार्‍या कर्मचार्‍यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी व कार्यशैली यांचा व्यावहारिक ताळमेळ घालण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी व्यवस्थापनाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून ‘एचआर’ विभागाने पार पाडावी, अशी अपेक्षा पण यानिमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.

नेतृत्वाची शक्यता आणि आवश्यकता:
बदलत्या व्यावसायिक परिस्थितीत कंपन्यांना नेर्तृत्वाची गरज पूर्वी कधी नव्हे एवढ्या वाढत्या प्रमाणावर भासत आहे. आर्थिक अस्थिरता हे यामागचे महत्त्वाचे कारण तर आहेच, शिवाय नेतृत्वक्षमता असणार्‍या कर्मचार्‍यांची चणचण भासत असल्याचे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 78 टक्के प्रतिसाद देणाºयंनी आपल्या स्वानुभवाने नमूद केले असून, त्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याचे प्रांजळपणे मान्य केले आहे. यासंदर्भात मनुष्यबळ विकासविषयक विशेषज्ज्ञ म्हणून ‘एचआर’ विभागावर विशेष व आव्हानात्मक जबाबदारी येते. नेतृत्व निर्मितीची ही प्रक्रिया केवळ प्रशिक्षणापूर्तीच मर्यादित न ठेवता त्यासाठी विशेष व योजनापूर्वक प्रयत्न करणे ही काळाजी गरज आहे. यातूनच नजिकच्या काळात औद्योगिक नेतृत्व निर्माण होणार हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

क्षमता आणि कार्यक्षमता :
कर्मचाºयंची क्षमताच नव्हे तर कार्यक्षमतेचा पण पुरेपूर वापर करण्यावर कंपन्यांच्या मुख्याधिकार्‍यांचा भर राहणार आहे. 36 टक्के प्रतिसाद देणार्‍या मुख्याधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या कार्यक्षमतेचा संपूर्ण व पुरेपूर उपयोग करण्यावर भर दिला आहे. यासाठी पण एचआर विभागाने प्रगतिशीलपणे विचार करून पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा या मुख्याधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

बदलती स्थिती आणि परिस्थिती :
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 60% मुख्याधिकार्‍यांनी असे प्रांजळपणे मान्य केले आहे की सद्य:स्थितीत कामगार संघटना, माध्यम-वृत्तपत्रे, स्थानिक संस्था व सोशल मीडिया इ.चा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होत असून, महत्त्वाचे म्हणजे यापैकी बहुसंख्य म्हणजेच 94% मुख्याधिकार्‍यांनी व्यवसाय प्रमुख म्हणून या सार्‍या समाजघटकांशी संवाद साधण्यावर भर देतानाच यासाठी एचआर विभागाचे सहकार्य आणि सहभाग अनिवार्य असण्यावर भर दिला आहे. सर्वेक्षणाच्या निमित्ताने व्यवसाय, व्यवस्थापन व एचआर या दोघांच्या संदर्भात स्पष्ट झालेली बाब म्हणजे व्यवसाय आणि त्यामध्ये काम करणार्‍या वा त्याच्याशी निगडित असणार्‍या व्यक्तींचा परस्पर व अयोग्य आा संबंध असून, व्यक्तिंशिवाय म्हणजेच कर्मचार्‍यांशिवाय व्यवसाय ही संकल्पना आता कालबाह्य ठरली असली तरी आपण व्यवसाय, व्यवस्थापनाला गरज खर्‍या अर्थाने कर्मचार्‍यांची म्हणजे ‘कुशल व कार्यक्षम कर्मचार्‍यांची’ गरज असून, ही गरज भागविण्याचे महनय काम एचआर विभागाने करावे व सद्य:स्थितीत एकूणच व्यवसायाला पूरक भूमिका घेऊन आपले योगदान द्यावे, असे विशेषत्वाने नमूद केले आहे. थोडक्यात म्हणजे ‘पीडब्ल्यूसी’च्या या प्रासंगिक सर्वेक्षणामुळे कंपनी व्यवस्थापनातील मानवीय पैलू प्रामुख्याने प्रकाशात आले असून, बदलत्या स्थितीत कर्मचार्‍यांचा विचार त्यांच्या क्षमता-कार्यक्षमतेपासून व्यावसायिक अनिश्चिततेपर्यंत सर्वच संदर्भात करण्यावर भर देण्यात आला आहे व यासंदर्भात एचआर विभागाकडून नव्याने व नव्या अपेक्षा पण व्यक्त करण्यात आली आहे.

या अपेक्षांवर आपापल्या ठिकाणच्या प्रचलित वा अपेक्षित स्थितीचा विचार करतानाच एचआर व्यवस्थापकांनी बदलत्या स्थितीत व प्राप्त परिस्थितीनुसार होणार्‍या वा येणार्‍या बदलांना केवळ सामोरेच न जाता त्यावर मात करण्यासाठी वे सक्षम आहेत का? त्याच्याजवळ त्यानुसार व्यवस्थापनपर क्षमता आहेत का? होणार्‍या व्यावसायिक बदलांना पूरक अशी भूमिका ते घेऊ शकतात का? व हे सारे घडवून आणण्यासाठी त्यांनी एचआर विभागात काय काय बदल घडविणे आवश्यक आहे यावर प्रामुख्याने व प्राधान्य तत्त्वावर विचार करणे त्यांच्याच हिताचे ठरणार आहे.