आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Davos Meet : Revenue Increase Said Country's CEO

दावोस परिषद : महसूल वाढीबाबत देशातील'सीईओ'ना आत्मविश्‍वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आणि भ्रष्टाचार हे दोन प्रमुख व्यावसायिक धोके कंपन्यांना सध्या सतावत आहेत, परंतु तरीही पुढील महिन्यात महसुलात चांगली वाढ होण्याचा ठाम आत्मविश्वास देशातील जवळपास अर्ध्याहून अधिक ‘सीईओं’नी व्यक्त केला असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.
दाओस येथे सुरू झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पीडब्ल्यूसीच्या 17 व्या वार्षिक जागतिक सीईओ सर्वेक्षण अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या अहवालामध्ये जवळपास 49 टक्के भारतीय व्यावसायिक प्रमुखांनी पुढील 12 महिन्यांमध्ये त्यांच्या महसूल वाढीसाठी चांगल्या संधी असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे जागतिक पातळीवरील सरासरी 39 टक्क्यांच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. गेल्या वर्षाच्या तिस -या तिमाहीत 68 देशांधील 1,344 सीईओंच्या मुलाखती घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
आपल्या कंपन्यांच्या वृद्धीच्या संभाव्यतेबाबत सीईओंच्या आत्मविश्वासामध्ये जागतिक यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे. रशियामधील 53 टक्के सीईओंनी याच कालावधीत महसुलात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केल्याने हा देश यादीत पहिल्या क्रमांकावर असून त्या पाठोपाठ मेक्सिको (51 टक्के) आणि कोरिया (50 टक्के) अनुक्रमे दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहेत. भारतानंतर चीन (48 टक्के) पाचव्या क्रमांकावर असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.
दीर्घकाळातील महसूल वाढीबाबतही जवळपास 70 टक्के भारतीय व्यवसाय प्रमुखांनी ठाम विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय कंपन्यांच्या पोषक वाढीसाठी उगवत्या अर्थव्यवस्था महत्त्वपूर्ण असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका देशदेखील टॉपवर आहेत.
चिंताजनक बाबी
चलन विनिमय दरातील चढ-उतार, अतिनियम, अपु-या पायाभूत सुविधा, वित्तीय तूट आणि कर्जाचा भार याबद्दल सरकारची मानसिकता, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, लाचखोरी आणि भ्रष्टाचार, सर्वात जास्त वृद्धी असलेल्या बाजारपेठेतील कामगारांचा वाढता खर्च.