आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिस-या तिमाहीत डीबी कॉर्पचा नफा 34 टक्क्यांनी वाढून 94 कोटींवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रसार माध्यम क्षेत्रातील डीबी कॉर्प कंपनीला 31 डिसेंबर 2013 अखेर संपलेल्या तिस-या तिमाहीत 94.46 कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिस-या तिमाहीच्या तुलनेत यंदा निव्वळ नफ्यात 33.75 टक्के वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजाराला डीबी कॉर्पने ही माहिती दिली. कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत एकूण उलाढालीतून 518.20 कोटी रुपयाचे एकूण उत्पन्न मिळवले. वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 438.88 कोटी रुपये होते.
डीबी कॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर अग्रवाल यांनी सांगितले की, या वर्षाची सुरुवात चांगली झाली आहे. तिस-या तिमाहीत कंपनीने चांगली कामगिरी नोंदवली आहे. एकूण खर्चावर नियंत्रण आणि सुरक्षिततेवर कंपनीने सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे.
आगामी योजनांबाबत त्यांनी सांगितले की, दुस-या आणि तिस-या श्रेणीच्या शहरांत विक्रीला चांगला वाव आहे. त्याचा लाभ उठवण्यावर आगामी काळात डीबी कॉर्पचे लक्ष राहील. अग्रवाल म्हणाले, दुस-या आणि तिस-या श्रेणीच्या शहरांतील आघाडीच्या ब्रँडच्या मार्केटिंग धोरणाचा अभ्यास करण्यावर कंपनीचा नेहमीच भर राहिला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संभाव्य संधीचा अंदाज येतो.