आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात घसरण कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जागतिक शेअर बाजारातील नरमाई आणि कंपन्यांच्या दुस-या तिमाहीतील निकालांबाबत बाजारात असलेली उत्सुकता यामुळे गुंतवणूकदारांनी सावध व्यवहार करणे पसंत केले. त्यामुळे आलटून पालटून झालेल्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सेन्सेक्स मोठ्या प्रमाणावर घसरला होता, परंतु तेल आणि वायू, सार्वजनिक उपक्रम, धातू आणि बँक समभागांना आलेल्या मागणीमुळे सेन्सेक्स २५ अंकांनी घसरला.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २५.१८ अंकांनी घसरून २६२४६.७९ वर बंद झाला. निफ्टी निर्देशांक ९.७० अंकांनी घसरून ७८४२.७० अंकाच्या पातळीवर बंद झाला. अगोदरच्या दाेन सत्रांमध्ये सेन्सेक्स ३५८.५४ अंकांनी गडगडला आहे.