आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi HC Permits Sales Of Xiaomi Smartphones Till 8th Jan

\'Xiaomi\'ला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा, 8 जानेवारीपर्यंत हॅंडसेटच्या विक्रीस परवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xiaomi (जिओमी) या चीनी स्मार्टफोन मेकर कंपनीला दिल्ली हायकोर्टाने थोडा दिलासा दिला आहे. हायकोर्टाने येत्या 8 जानेवारीपर्यंत भारतात क्वॉलकॉम बेस्ड हॅडसेट्‍सची आयात तसेच विक्रीवरील बंदी उठवली आहे. तसेच 'फ्लिपकार्ट'ला Xiaomi चे हॅंडसेट्‍स विक्री करण्यास परवानगी दिली आहे.

यामुळे घातली होती बंदी...
Ericsson कंपनीने Xiaomi कंपनीविरोधात पेटेंट चोरल्याचे आरोप केले होते. एक नव्हे तर तब्बल आठ खटले Ericsson ने Xiaomi विरोधात दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाने 'Xiaomi Redmi Note' आणि 'Xiaomi Redmi 1S' या दोन फोनवर भारतात बंदी घालण्यात आली होती. त्यापाठोपाठ Xiaomi च्या सर्वच स्मार्टफोन्सच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.
Xiaomi ने आपल्या हॅंडसेट्‍समध्ये वापरलेले AMR, EDGE आणि 3G तसेच अन्य टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानाचे पेटेंटवर Ericsson ने दावा केला होता. मात्र, त्याकडे Xiaomi ने दुर्लक्ष केले होते. अखेर Ericsson ने Xiaomi ला कोर्टात खेचले होते.

कोर्टाच्या आदेशानुसार, Ericsson मोबाईल टेक्नॉलॉजीचे पेटंट चोरणार्‍या Xiaomi चे हँडसेट्सची भविष्यात निर्मिती होणार नाही तसेच तयार झालेले हॅंडसेट्‍स भारतात आयात केली जाणार नसल्याने निर्देश कोर्टाने कस्टम अधिकार्‍यांना दिले होते.

'मायक्रोमॅक्स' आणि 'इंटेक्स'वरही कारवाईची शक्यता...
एका अहवालानुसार, Xiaomi ने Ericsson ने पाठवलेल्या नोटिशीला कोणतेही प्रत्त्युत्तर दिले नव्हते. त्यामुळे Ericsson ने पेटंटचे उल्लंघन केल्याविरोधात कोर्टात खटला दाखल केला होता. Xiaomi प्रमाणे micromax आणि Intex कंपनीवरही कारवाईची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, Xiaomiच्या स्मार्टफोन्समधील फीचर्स...