आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Is On Top In Terms Of Highest Income Around The India

भारतात येथे मिळतो सर्वात जास्त पगार, खिशात नेहमी असतात हजारों रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आगामी दोन महिन्यांत नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. नोकरदार वर्गासाठी हा काळ सॅलरी इन्क्रीमेंटचा असल्याने त्यांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह असतो. पण भारतात कोणत्या भागात आणि कोणत्या शहरातील लोक सर्वाधिक कमाई करतात हे आपल्याला माहिती आहे का? भारताचे कोणते राज्य पगाराच्या बाबतीत आघाडीवर आहे, असे विचारले तर साहजिकच तुमचे उत्तर बेंगळुरू आणि मुंबई असे येईल. पण ते खरे नाही. भारतात सर्वाधिक पगार कुठे मिळतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
 
राजधानी दिल्ली
भारत देश 1,700 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनला आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये दिल्लीत दरडोई उत्पन्न वर्षाकाठी 2,19,979 लाख रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा आकडा 1,92,587 लाख रुपये होता.
 
5 वर्षांत 73 टक्के वाढ
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत दिल्लीमध्ये दरडोई उत्पन्नात वेगाने वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षांत यात 73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ राष्ट्रीय सरासरीच्या तीनपट अधिक आहे. एका वर्षात दिल्लीत दरडोई उत्पन्नात 27,397 एवढी वाढ झाली आहे. दरडोई उत्पन्नाची राष्ट्रीय सरासरी 61,564 रुपये आहे.
 
दरडोई उत्पन्न म्हणजे काय?
यावरून कोणत्याही भागात व्यक्तीनुसार उत्पन्न किती आहे याची माहिती मिळते. त्यावरून एखाद्या शहराचे जीवनमान कसे आहे किंवा त्याचा दर्जा कसा आहे, याची माहिती मिळते. देशाच्या एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागल्यास दरडोई उत्पन्न मिळते.
 
पुढे वाचा, कोणते राज्य आहे दुसर्‍या स्थानावर...
(फोटो प्रतिकात्मक)