आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'डेल\' ची पुन्हा भरारी; संस्‍थापक माइकल डेल कंपनीची करणार पुनर्खरेदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळूर- संगणक बनवणारी जगातील तिस-या क्रमांकाची डेल कंपनीला नवा जन्म मिळणार आहे. डेलची पुनर्खरेदी करत असल्याची घोषणा कंपनीचे संस्थापक माइकल डेल यांनी बंगळूर येथे केली. नॅस्कॉम संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात डेल बोलत होते. यावेळी माहिती तंत्रज्ञानातील उद्योगपती उपस्थित होते. डेल म्हणाले, पुनर्खरेदीमुळे कंपनीच्या उत्साहात वाढ होणार आहे. त्यामुळे ' डेल' ला नवीन संजीवनी मिळणार आहे.

डेल या कंपनीची स्थापना माइकलने विद्यार्थीदशेत केली. पुनर्खरेदीसाठी समभागधारकांची 18 जूनला मतदान घेण्‍यात येणार आहे. कंपनीच्या प्रगतीला वेग येईल व संशोधन आणि विकासावर गुंतवणूक,सुविधा व साफ्टवेअर, नवीन ग्राहक जोडणे, विक्रीत वाढ आदींना गती मिळणार असल्याचे डेल यांनी सांगितले.