आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Demand Decline In Gold World Gold Council's Report

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन्याच्या मागणीत घसरण - जागतिक सुवर्ण परिषदेचा अहवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील मौल्यवान धातूच्या किमतींत झालेली लक्षणीय वाढ, सोन्याच्या वाढत्या आयातीला अंकुश लावण्यासाठी सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचा निषेध करण्यासाठी सराफ्यांनी केलेला संप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात शुल्कात झालेली वाढ या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम सोन्याच्या मागणीवर झाला आहे. परिणामी मागील वर्षात 12 टक्क्यांनी घसरून ती त्या अगोदरच्या वर्षातल्या 986.3 टनांवरून 864.2 टनांवर आली असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

सराफा बाजारातील लक्षणीय वाढलेल्या किमती, आयातीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावाला दागिने उत्पादकांकडून झालेला प्रखर विरोध आणि सर्वाधिक आयात शुल्क यामुळे गेल्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ग्राहकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला, परंतु लग्नसराई आणि सणासुदीच्या हंगामामुळे दुस-या सहामाहीत सराफा बाजारात पुन्हा तेजीची धारणा निर्माण झाली.

सोन्याची मागणी वाढणार
सोन्याच्या कल लक्षात घेता पुढील वर्षात सोन्याच्या मागणीत 11 टक्क्यांनी वाढ होऊन ती 865 ते 965 टनांवर जाण्याचा अंदाज परिषदेने व्यक्त केला असून चीननंतर सोन्यासाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ ठरेल, असेही म्हटले आहे. मध्यवर्ती बँकांची पूर्ण वर्षातील खरेदी 2011 च्या तुलनेत 17 टक्के वाढून 534.6 टनांवर गेली असून ती 1964 नंतरची सर्वोच्च खरेदी आहे. चौथ्या तिमाहीत मध्यवर्ती बँकांची खरेदी 145.0 टन झाली, जी मागील वर्षातील समान तिमाहीच्या तुलनेत 29 टक्के अधिक आहे. 2012 मध्ये ईटीएफमधील जागतिक गुंतवणूक 51 टक्के अशी चांगली वाढली. मात्र, चौथ्या तिमाहीत ती 88.1 टन झाली होती.

गुंतवणुकीचे प्रमाण घटले
सोन्यातील गुंतवणुकीचे एकूण प्रमाण 15 टक्क्यांनी घटले असून ते 2011 वर्षातल्या 368 टनांवरून 312.3 टनांवर आले. मूल्य स्वरूपात सोन्यातील गुंतवणूक किरकोळ 3 टक्क्यांनी घटून ती 86,936.7 कोटी रुपयांवरून 89,412 कोटी रुपयांवर आली. जागतिक पातळीवरच्या आव्हानात्मक वातावरणातही भारत आणि चीन या दोन्ही देशांनी जगातील ‘गोल्ड पॉवर हाऊस’ म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. सोन्याच्या मागणीला लगाम घालण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असूनही भारतीय ग्राहकांमध्ये सोने खरेदीची भक्कम धारणा आहे.

दागिन्यांची मागणी कमी झाली
दागिन्यांची मागणी 2011 वर्षातल्या 618.3 टनांच्या तुलनेत 11 टक्क्यांनी घसरून गेल्या वर्षात ती 552 टनांवर आली, परंतु मूल्य स्वरूपातील मागणी 8 टक्क्यांनी वाढून ती याच कालावधीत अगोदरच्या 1,46,067.8 कोटी रुपयांवरून 1,58,090 कोटींवर गेली.