आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्रा ट्रॅक्टर उत्पादन चार दिवस बंद ठेवणार, मागणी घटल्याने घेतला निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मागणीत घट झाल्याने महिंद्रा अँड महिंद्रा चार दिवस ट्रॅक्टरचे उत्पादन बंद ठेवणार आहे. ऑक्टोबरमधील चार दिवस कंपनीच्या रुद्रपूर आणि जयपूर येथील प्रकल्पातील ट्रॅक्टरचे उत्पादन चार दिवस बंद राहणार आहे. विक्रीची मागणी व उत्पादन यातील संतुलन राखण्यासाठी महिंद्रा महिन्याला आढावा घेऊन उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेते, त्याच योजनेचा एक भाग म्हणून ऑक्टोबरमध्ये ट्रॅक्टरचे उत्पादन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महिंद्राने मुंबई शेअर बाजाराला दिली. या निर्णयामुळे बाजारातील ट्रॅक्टरच्या उपलब्धतेवर परिणाम होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
सप्टेंबरमध्ये महिंद्रा अँड महिंद्राने २८,७३९ ट्रॅक्टरची विक्री केली होती. गतवर्षीच्या सप्टेंबरमधील विक्रीच्या तुलनेत यंदा विक्रीत ७.३९ टक्के वाढ नोंद झाली आहे. मात्र, यंदा मागणी तुलनेत कमी असल्याने ट्रॅक्टरचे उत्पादन चार दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. या पूर्वीही कंपनीने ऑगस्टमध्ये मागणी कमी झाल्याने सर्व वाहन प्रकल्पातील काम चार दिवस बंद ठेवले होते.