आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Dendroid' Virus Targeting Android Phones In India

अँड्रॉइड सिस्टिम फोन्सना डेंड्रॉइड व्हायरसचा धोका!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अँड्रॉइडधारकांसाठी डेंड्रॉइड नावाचा व्हायरस मोठी डोकेदुखी ठरू शकतो. अँड्रॉइड फोन्समध्ये सहजपणे प्रवेश करू शकणारा हा व्हायरस कोणत्याही प्रकारचा उच्छाद माजवू शकतो. या व्हायरसपासून खबरदारी घेण्यासाठी भारतीय सायबर संरक्षण विभागातर्फे सर्व अँड्रॉइडधारकांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. हा व्हायरस मोबाइल फोनमध्ये दिलेली कमांड बदलण्यापासून कॉल लॉग डिलिट करणे, वेब पेजेस ओपन करणे, कोणताही नंबर डायल करणे, कॉल रेकॉर्ड करणे, एसएमएसमध्ये अडथळे आणणे, ऑडिओ, इमेज किंवा व्हिडिओ अपलोड करणे तसेच कोणतेही अ‍ॅप्लिकेशन ओपन करण्यासाठी कुठलीही मनमानी करू शकतो.

ट्रोझनवर्गीय व्हायरस
डेंड्रॉइड नावाचा हा व्हायरस ट्रोझनवर्गीय असून तो एकदा सक्रिय झाल्यानंतर वापरकर्त्याच्या सर्व्हरवर तसेच फोनमधील सर्व वैयक्तिक माहितीवर पूर्णपणे ताबा मिळवू शकतो. फोनमधून जाणारे एसएमएस आणि येणार्‍या मेसेजेसवर वापरकर्त्याचे नियंत्रण राहत नाही. फोनमध्ये अशा प्रकारचे अ‍ॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठीच हा व्हायरस तयार करण्यात आला आहे. भारतातील कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी- इन)ने याबाबत सूचना जारी केल्या आहेत.

ही खबरदारी बाळगा
०कोणत्याही अविश्वसनीय वेबसाइटवरून अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड अथवा इन्स्टॉल करू नका
० नेहमी वापरातील, तसेच विश्वसनीय अ‍ॅप्लिकेशन मार्केटचाच वापर करा
० मोबाइलमधील अँटी व्हायरस सिस्टिम सतत सुरू ठेवा.
० अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करण्यापूर्वी मागितल्या जाणार्‍या परवानग्या पुन्हा पुन्हा तपासून पाहा.

० सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांनी डाटा युसेजवरही नजर ठेवण्याचे आवाहन सीईआरटीतर्फे करण्यात आले आहे.
० तसेच बॅटरी किंवा मोबाइल बिलात अचानकपणे वाढ झाल्यासदेखील हा व्हायरस अँड्रॉइड फोनमध्ये शिरला असण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते.

नामसाधर्म्यामुळे सहज फसवणूक
सायबर संरक्षक तज्ज्ञांच्या मते, ‘अँड्रॉइड’ या शब्दाशी या व्हायरसचे नाव खूप साधर्म्य पावणारे असल्यामुळे खूप विचारपूर्वक त्याची निर्मिती करण्यात आली आहे.