आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकारी बँकांतील ठेवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सध्याच्या काळात प्रत्येक गुंतवणूकदाराला आपल्या कष्टार्जित कमाईतील बचतीवर जास्तीत जास्त परतावा, लाभ मिळवण्याची मनोमन इच्छा असते. त्यातही मध्यमवर्गातील छोट्या गुंतवणूकदारांना वाढत्या महागाईत तोंड देत असताना शक्य तेवढ्या जास्त व्याजदराने उत्पन्न वाढावे अशी इच्छा असते. असे असतानाही सहकारी बॅँकांत ठेवी ठेवायला लोक कचरताना दिसतात. वास्तविक जवळजवळ सर्वच सहकारी बॅँका या ठेवीदारांना, राष्ट्रीयीकृत बॅँका व खासगी बॅँका देतात त्यापेक्षा एक ते दोन टक्के जास्त दराने व्याज देतात. व्याजदर जास्त, त्याअर्थी जोखीम जास्त या सर्वसाधारण नियमाची लोकांना भीती वाटते. पण प्रत्यक्षात तसे नाही. कित्येक सहकारी बँका अन्य क्षेत्रातील बॅँकांपेक्षा सरस काम करीत असतात.

दुसरे एक कारण - सहकारी बॅँक म्हणजे गलथान कारभार, सत्तेसाठी राजकारण व भ्रष्टाचार यांचा प्रादुर्भाव असा समज आहे. म्हणूनच ज्या सहकारी बॅँकेत गलथान कारभार, सत्तेसाठी राजकारण व भ्रष्टाचार नाही किंवा नगण्य आहे तेथेच ठेवी ठेवून जास्त व्याज मिळवायला हरकत नाही. तिसरे कारण म्हणजे एक गैरसमज करून देण्यात आला आहे की, सहकारी बॅँकांमधील ठेवींना संरक्षण नाही. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. सहकारी बॅँकांवर सहकार खात्याचे लक्ष असतेच, शिवाय या सरकारी सहकारी नियंत्रणाशिवाय अन्य बॅँकांवर असते. तेवढेच नियंत्रण रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाचेही असते. तसेच सगळ्याच बॅँका या डीआयसीजीसीच्या ( ठेव विमा-पत-हमी मंडळ) दृष्टीने सारख्याच असतात. त्यामुळे सहकारी बॅँकांमधील ठेवींनाही प्रत्येक खातेदारास एक लाख रकमेपर्यंतच्या ठेवीला पूर्ण संरक्षण असते. म्हणून जास्त व्याजदर लाभासाठी सहकारी बॅँकेत ठेवी एक लाखापर्यंत बिनधास्त ठेवायला हरकत नाही.
केवळ व्याजदर लाभ जास्त आहे असे नाही तर सहकारी बॅँका आता अन्य बॅँकांसारख्याच सर्व सेवा देतात तर मग त्या घ्यायला कचरण्यात अर्थ नसतो. याशिवाय सहकारी बॅँका या आता अन्य बॅँकांप्रमाणेच सर्व सेवा देऊ लागल्या आहेत. खासगी बॅँकांच्या तुलनेत कमी सेवा शुल्क (दर) आकारले जातात. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन सहकारी बॅँकेत ठेवी ठेवणे व सेवा घेणे या गोष्टी जरूर घ्याव्यात. अर्थात सहकारी बॅँकेत ठेवी ठेवताना काही गोष्टी लक्षात घ्याव्यात. डीआयसीजीसीचे ठेव संरक्षण हे एक लाख रुपयांच्या ठेवीपर्यंत मर्यादित असते. म्हणून खालील काळजी घ्यावी.
*बॅँकेत ठेव ठेवताना ती जास्तीत जास्त एक लाखाची एका व्यक्तीच्या नावावर ठेवावी.
* ज्या बॅँकेत ठेव ठेवायची त्या बॅँकेने डीआयसीजीसीचा वार्षिक हप्ता अद्ययावत भरलेला आहे याची खात्री करा.
* आपल्याला एक लाख रुपयांच्या ठेवींपर्यंत संरक्षण आहे, याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नावावरील बचत, रिकरिंग मुदतठेव व व्याज या सर्वांच्या एकत्रित रकमेला एक लाख रुपयांचे संरक्षण आहे.
* आपल्याला एक लाख रुपयांवर ठेवी ठेवायच्या असतील तर त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या नावाने प्रत्येकी एक लाख याप्रमाणे ठेवाव्यात.
* संयुक्त ठेवी ठेवताना प्रत्येकी एक लाख व त्यातील एकावर एकाचे प्रथम नाव व दुस-यावर दुसरे प्रथम नाव असे ठेवावे.
* व्याज, तिमाही, सहामाही काढून घ्यावे व उर्वरित ठेव एक लाखापर्यंत राहील, असे पाहावे.
* ही एक लाखाची मर्यादा, बॅँकेतील एकूण ठेवींच्या बाबतीत लागू आहे.
* एका लाखापर्यंतचे डीआयसीजीसीचे संरक्षण म्हणून तेवढीच ठेव असे सर्रास सर्व सहकारी बॅँकांच्या बाबतीत करण्याचे कारण नाही. अन्य बॅँका तशा सहकारी बॅँका, त्यांची सांपत्तिक परिस्थिती, ठेवी, कर्जे, त्यांचे प्रमाण, नफा, त्यांतील वाढ व त्यांचे प्रमाण थकबाकी, एनपीए त्यांचे प्रमाण व वाढ हे सर्व पाहावे व ठीक असेल तर सहकारी बॅँकेत जास्त ठेवी ठेवून लाभ घेण्यास काहीच हरकत नाही. सहकारी बँका तत्पर व स्वस्त सेवा, जास्त व्याजदर व व्याजातून करकपात नाही हे लाभ देतात व हे सारे चांगल्या सहकारी बॅँकेत सामान्य माणसाने जरूर घ्यावे
असे आहे.