आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहन उद्योगाची नव्या वर्षाची सुरुवात विक्रीतील घटीने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारने वाहनांवरील अबकारी शुल्क सवलत ३१ डिसेंबरपासून रद्द केली. त्यानंतर सर्वच कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्या. याचा फटका जानेवारीतील वाहन विक्रीला बसला. मारुती-सुझुकी व ह्युंदाई या मुख्य कंपन्यांनी कशीबशी एकेरी अंकांतील वाढ नोंदवली, तर जीएम मोटर्स आणि फोर्ड कंपन्यांच्या विक्रीत घसरण दिसून आली. टाटा मोटर्स आणि होंडाने फेब्रुवारीत विक्री वाढीची अपेक्षा व्यक्त केली.

मारुती सुझुकी कंपनीने जानेवारीत वाहन विक्रीत ९.३ टक्के वाढ नोंदवली. कंपनीने या महिन्यात १,०५,५५९ कार विकल्या. जानेवारी २०१४ मध्ये कंपनीने ९६,५६९ कारची विक्री केली होती. कंपनीच्या अल्टो, वॅगन आर या मिनी सेगमेंट कारच्या विक्रीत ७.३ टक्के घट, तर स्विफ्ट, डिझायर, इस्टिलो, रिट्झ या कारच्या विक्रीत ७.५ टक्के वाढ झाली. मारुतीची स्पर्धक ह्युंदाईच्या विक्रीत ४.१ टक्के वाढ झाली आहे. ह्युंदाईने जानेवारी २०१४ मध्ये ३३,४०५ कारची विक्री केली होती, यंदा ३४,७८० कार विकल्या.

दुहेरी वाढ
- जानेवारीत अबकारी शुल्कातील वाढ व त्यामुळे वाहनांच्या वाढलेल्या किमती अशी दुहेरी वाढ झाल्याचा दबाव वाहन विक्रीवर दिसून आला. - राकेश श्रीवास्तव, वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री)ह्युंदाई मोटर्स.

विक्रीत बजाजला फटका
बजाज ऑटोच्या विक्रीत जानेवारीत १२ टक्के घसरण दिसून आली आहे. चेन्नई स्थित टीव्हीएस मोटर्सच्या विक्रीत ३ टक्के, तर होंडा मोटारसायकलच्या विक्रीत १४.२४ टक्के वाढ झाली आहे. हीरो मोटोकाॅर्पच्या विक्रीतही किरकोळ घट झाली आहे. यामाहाच्या विक्रीत २०.८२ टक्के वाढ झाली आहे.

विक्रीचा आलेख
- जनरल मोटर्स इंडियाच्या विक्रीत १६ टक्के घट.
- महिंद्रा अँड महिंद्राच्या विक्रीत ८ टक्के घसरण.
- टाटा मोटर्सने बोल्टच्या जोरावर विक्रीत १८.८९ टक्के वाढ नोंदवली आहे.
- होंडा कार्सची विक्री जानेवारीत १६.६५ टक्क्यांनी वाढली आहे.
- फोर्ड इंडियाची विक्री वार्षिक तुलनेत किंचित घटली आहे.