आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Despite Sharp Fall In Stock Prices, Gold Loan Firms Put Up A Brave Face

सोने तारण, ज्वेलरी कंपन्यांचे शेअर्स आपटले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोन्याच्या किमतीने 15 महिन्यांचा नीचांक गाठल्याने मणप्पुरम फायनान्ससारख्या सोने तारण कंपन्या आणि ब्रँडेड दागिन्यांच्या कंपन्यांचे समभाग 13 टक्क्यांपर्यंत गडगडले. सर्वाधिक फटका मुथुट फायनान्सच्या शेअर्सला बसला.

जागतिक घडामोडीने सोन्याची झळाळी काळवंडली. गेल्या तीन दिवसांत सोने तोळ्यामागे तीन हजार रुपयांनी स्वस्त झाले. परिणामी शेअर बाजारातील सोने तारण, दागिने तयार करणा-या कंपन्यांच्या शेअर्सची जोरदार विक्री झाली. सर्वात जास्त फटका मुथुट फायनान्स कंपनीला बसला. मुथुट फायनान्सचा शेअर 13.13 टक्क्यांनी घसरून 131.35 रुपयांवर बंद झाला. मनप्पुरम फायनान्सचा शेअर 9.84 टक्के घसरून 17.40 रुपयांवर बंद झाला.

ब्रँडेड दागिने विकणा-या कंपन्यांच्या समभागांचीही जोरदार विक्री झाली. पी, सी ज्वेलर्सचा शेअर 5.65 टक्के घसरला, थँगमेइल ज्वेलरीचा शेअर 5.45 टक्के टायटन इंडस्ट्रीजचे समभाग 4.37 टक्के, गीतांजली जेम्सचा शेअर 2.40 टक्के, तर त्रिभुवनदास भीमजी जव्हेरीचे समभाग 0.86 टक्क्यांनी घसरले. सोने तोळ्यामागे तीन हजार रुपयांनी स्वस्त झाले. परिणामी शेअर बाजारातील सोने तारण, दागिने तयार करणा-या कंपन्यांच्या शेअर्सची जोरदार विक्री झाली.