आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाची संधी, आपच्या विजयावर उद्योग जगत खुश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीत आम आदमी पार्टीच्या बहुमताचे उद्योग जगताने स्वागत केले आहे. आपचा जबरदस्त विजय मोठे राजकीय पक्ष, धोरणकर्ते आणि उद्योग जगतासाठी एक धडा असल्याचे मत असोचेमने व्यक्त केले आहे. गोर-गरीब या विजयाचे खरे शिल्पकार असून पारंपरिक मध्यमवर्गाचा विजय नव्हे. तळागळातील समाजच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून तो स्वत:ला मुख्य प्रवाहापासून वेगळा मानतो, असेही असोचेमने म्हटले आहे. बहुमतामुळे दिल्लीचा विकास साधण्यास चांगली मदत होईल, असे मत इतर उद्योग संघटनांनी व्यक्त केले आहे.

नवे सरकार उद्योगाचा विकास होण्याच्या दृष्टीने काम करेल, अशी अपेक्षा सीआयआय या संघटनेने व्यक्त केली आहे. राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाकडे आप लक्ष देईल, असे सांगत सीआयआयने म्हटले की, नव्या नेतृत्वाबरोबर जीएसटी, कौशल्य विकास, सेवा क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास, पाणी व्यवस्थापन, महिला सुरक्षा यासाठी संघटना तयार आहे. सीआयआयने दिल्लीसाठी व्हिजन २०२० सुद्धा तयार केले आहे.

पीएचडी चेंबरने आपचा विजय म्हणजे स्वच्छ राजकारणाचा विजय असल्याचे म्हटले आहे. चांगल्या प्रशासनाचाही या विजयात वाटा आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आपने शिक्षण, महिला सुरक्षा, पाणी, वीज आणि कचरा व्यवस्थापन यावर काम करावे. तसेच दिल्लीचा औद्योगिक विकास साधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पीएचडी चेंबरच्या मते दिल्लीच्या विकासासाठी नव्या पायाभूत सुविधांसह वीज-पाण्याचीही अत्यंत गरज आहे.