आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाला सावरण्याच्या नादात विकास घटणार, रिझर्व्ह बँकेच्या कडक धोरणामुळे अडचण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विदेशी चलन बाजारात स्थिरतेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले धोरण भले कितीही कडक केले तरी हे पाऊल पुरेसे लाभदायी नाही. उलट यामुळे देशाच्या आर्थिक विकास चक्राची गती आणखी मंद होण्याची शक्यता आहे. पतधोरण कडक बनवण्यासाठी उचलण्यात येणारी पावले कायम ठेवली तर चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर घसरून 5 टक्क्यांहून खाली येण्याची शक्यता आहे.


बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंच (बीओएफए-एमएल) या विदेशी ब्रोकरेज फर्मच्या मते, देशाच्या बँकिंग व्यवस्थेतील रोख रकमेचा ओघ आटवण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांमुळे सकल राष्ट्रीय उत्पादनावर (जीडीपी) प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशीच स्थिती राहिली देशाचा जीडीपी विकास दर आणखी घसरून 4.8 टक्के या खालच्या पातळीपर्यंत येऊ शकतो.


दरम्यान, मॉर्गन स्टॅनलेच्या संशोधन अहवालानुसार पतधोरण जास्त कडक केल्याने तसेच जागतिक भांडवल बाजारात अनिश्चितता कायम असल्याने येत्या किमान दोन तिमाहीपर्यंत आर्थिक विकासाचा वेग आणखी मंदावण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे, तर यामुळे देशाच्या जीडीपी वाढीचा दर 3.5 ते 4 टक्के असा नीचांक नोंदवू शकतो.


आर्थिक वर्ष 2012-13 मध्ये देशाचा आर्थिक विकासाचा दर 5 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. देशाच्या आर्थिक विकासाला बसलेला हा मोठा झटका
असून मागील दहा वर्षांतील हा नीचांक आहे.


पाऊल काय
विदेशी चलन बाजारात स्थैर्य येण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जास्त कडक केले आहे.


परिणाम काय
बँक ऑफ अमेरिका-मेरिल लिंचच्या मते यामुळे देशाचा जीडीपी वाढीचा दर आणखी घसरून 4.8 टक्के या पातळीपर्यंत येऊ शकतो. मॉर्गन स्टॅनलेच्या मते, यामुळे चालू आर्थिक वर्षात देशाच्या आर्थिक विकास वाढीचा दर 3.5 ते 4 टक्के असा नीचांक नोंदवू शकतो.