आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Development Growth News In Marathi, India Rating Estimation, Divya Marathi

आर्थिक विकासदरात 5.6% वाढ,इंडिया रेटिंग्जचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विद्यमान वित्तीय वर्षात आर्थिक विकासदरात पाच टक्क्यांपेक्षा कमी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतु पुढील आर्थिक वर्षात मात्र विकासदरात 5.6 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च
या संस्थेने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.


गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पुढील वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेला चांगला आकार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीमध्ये 5.6 टक्के वाढ होण्याचा अंदाज या मानांकन संस्थेने व्यक्त केला आहे.पुढील वित्तीय वर्षात आर्थिक वाढीमध्ये मोलाचा वाटा औद्योगिक क्षेत्राचा असण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्रात 4.1 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुूळे केंद्र तसेच राज्य सरकारच्या दृष्टीने दिलासा देणारी गोष्ट ठरणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. व्यापारी निर्यातदेखील पुढील आर्थिक वर्षात 8 ते 10 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.