आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवगडचा हापूस मिळणार ऑनलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जगभरात आपल्या गोडव्यासाठी आणि चवीसाठी मोस्ट वाँटेड असणारा देवगडचा हापूस आंबा आता ग्राहकांपर्यंत ऑनलाइन पोहोचणार आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने (डीटीएयूएसएस) या ई-कॉमर्सला सुरुवात केली आहे. www.devgadmango.com या वेबसाइटवरून देवगड हापूसचे चाहते आता थेट देवगडच्या आंबा उत्पादक शेतकºयांकडे आपली मागणी नोंदवू शकतील आणि तीन ते चार दिवसांत देवगडचा हापूस ग्राहकांच्या घरात दाखल होईल.
डीटीएयूएसएसचे संस्थापक, अध्यक्ष आणि संचालक अजित गोगटे यांनी दै. ‘दिव्य मराठी’शी बोलताना ही माहिती दिली. या नव्या उपक्रमामुळे बनावट देवगड हापूस विकणाºयांना चाप बसेल आणि दलालांच्या विळख्यातून हापूसची सुटका होईल, असे ते म्हणाले. देवगड तालुक्यातील 700 आंबा उत्पादक शेतकरी डीटीएयूएसएसचे सभासद आहेत. सुमारे 45 हजार एकरांवर हापूसची कलमे असून 50 हजार टनांचे उत्पादन आहे, असेही ते म्हणाले.


मुख्य विपणन अधिकारी ओंकार सप्रे म्हणाले, हापूसची मागणी ऑनलाइन नोंदवल्याने बनावटगिरी, रासायनिक द्रव्यांचा वापर करून आंबा पिकवणे, भेसळीचा आंबा आदी प्रकारांना आळा बसणार आहे.


ग्रेड निश्चितीचे निकष
ए 2 वजन 326 ते 350 ग्रॅम्स
ए 1 वजन 301 ते 325 ग्रॅम्स
ग्रेड 1 वजन 276 ते 300 ग्रॅम
ग्रेड 2 वजन 251 ते 275 ग्रॅम्स
ग्रेड 3 वजन 226 ते 250 ग्रॅम्स
ग्रेड 4 वजन 200 ते 225 ग्रॅम्स


निर्यातीसाठीचे निकष असे
फळाचा सर्वांगीण दर्जा
आकार, वजन, रंग, चव
डाग नसावेत, किडीची निदर्शक खार नसावी,
काढताना आपटलेला, मार खाल्लेला नसावा,
देठ तुटलेले नसावे, फळमाशीचा संसर्ग नको,
पोकळ नसावा, कोवळा असताना उतरवलेला नसावा,


रासायनिक द्रव्यांचा वापर निषिद्ध - कॅल्शियम कार्बाइडचा वापर पिवळेपणासाठी केला जातो.
फळांवर किटकनाशक अंशाचे प्रमाण जागतिक मानकांनुसार असावेत


इतर फळांबाबतही विचार
देवगडमधील आंबा उत्पादनासोबत काजू, पपई, जांभूळ, अननस, फणस, चिकू या फळांचेही विपणन आधुनिक पद्धतीने करण्याचा विचार सुरू आहे. तसेच देवगड परिसरात या फळांवरील प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी सहा एकर जागेवर फॅक्टरी उभारण्यात आली आहे. या फॅक्टरीची उत्पादन क्षमता पाच टन प्रतितास इतकी असेल.
अजित गोगटे, संस्थापक अध्यक्ष, देवगड तालुका आंबा उत्पादन सहकारी संस्था.