आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएचएफएलची महिलांसाठी विशेष कर्ज योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गृहवित्त क्षेत्रात कार्यरत असलेल्या डीएचएफएल कंपनीने आपल्या गृहकर्ज योजनांमध्ये खास महिलांसाठी विशेष योजना आणली आहे.

या योजनेमध्ये सर्व मालमत्तेच्या एकमात्र व सहमालक असलेल्या एकमेव वा प्रथम महिला अर्जदारांना व्याजदरात पाव टक्क्यांची सूट मिळणार आहे. कंपनीच्या देशभरातील 456 कार्यालयांमध्ये येत्या 25 मार्चपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या कालावधीत घेतलेल्या गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कातही पाव टक्के सवलत मिळणार आहे. ‘डीएचएफएल होम लोन फॉर विमेन’ ही योजना महिलांना घर विकत घेण्यासाठी किंवा घरात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांचे सबलीकरण करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य विकास अधिकारी राकेश मक्कर यांनी सांगितले.