आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डायलिसिसची दर्जेदार सेवा देणारी 'नेफ़्रोप्लस इंडिया' महाराष्ट्रात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - रुग्णांना डायलिसिसची दर्जेदार सेवा देणारी नेफ़्रोप्लस इंडिया महाराष्ट्रात सेवा विस्तार करणार असून चालू आर्थिक वर्षात पुणे, नागपूर आणि औरंगाबादमध्ये केंद्र सुरु करणार आहे अशी माहिती संस्थापक आणि मुख्याधिकारी विक्रम वुप्पाला यांनी निवडक पत्रकारांना दिली.

पहिल्या टप्प्यात पुण्यात आणि येत्या सहा महिन्यात नागपूर आणि औरंगाबादमध्ये केंद्र सुरु केले जाणार आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की सध्या देशातील आठ राज्यात आमची सेवा दिली जाते त्यात दिल्ली , हरियाना, आंध्र प्रदेश , उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू , केरळ यांचा समावेश आहे. त्यासाठी आम्ही माक्स हॉस्पिटल समूहाशी करार केला आहे . देशात सध्या १७ केंद्रे आहेत. आलेप्पिमध्ये सुट्टीवर या आणि डायलिसीस करा आशी अभिनव कल्पना आम्ही राबविली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्राथमिक टप्प्यात आमच्याकडे २५ कोटी रुपये भांडवल जाम झाले आणि त्यातील १ ३ कोटी गुंतवण्यात आले. येत्या सहा ते नऊ महिन्यात आणखी एक दीड कोटी डॉलर गुंतवले जाणार आहेत.

सध्या कंपनीत ३५० कर्मचारी काम करत आहेत मात्र कुशल मनुष्यबळ मिळणे ही अडचण लक्षात घेऊन आम्ही पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेशी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र आभ्यासक्रम यासाठी करार केला आहे अशी माहिती देऊन ते म्हणाले की कंपनीचे एक संस्थापक कमल शहा हे स्वतः रुग्ण आहेत. चांगली सेवा मिळणे किती गरजेचे आहे हे लक्षात आल्याने त्यांनी कंपनी सुरु केली. भारतीय उपखंडातील अनेक देश तसेच पश्चिम आशिया आणि आफ्रिकेत अशा प्रकारच्या सेवेची गरज आहे मात्र विश्वासू पुरवठादार नाहीत. त्या देशात विस्ता राचा आमचा विचार आहे.

देशात येतात कालबाह्य मशीन
डायलिसीस करण्यास वापरली जाणारी यंत्रे आयात केल्यास त्याची किंमत सहा लाख रुपये आहे. भारतात वापरली जाणारी बहुतेक यंत्रे ब्रिटन आणि अमेरिकेत वापरून कालबाह्य झालेली आहेत. पाच वर्षे किंवा १५ हजार तास वापरलेली यंत्र परदेशात फेकून दिली जातात तीच आपल्याकडे तेतात त्यातील काहींचा वापर संसर्गजन्य आजार झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी केला जातो. अशी यंत्रे देशातील काही व्यापारी आणि तंत्रज्ञ आयात करतात आणि त्यात बदल करून रुग्णालयांना सरासरी दोन लाख रुपयांना विकतात. अशी यंत्र भारतात पाठविणे बेकायदा असूनही सरकार त्याकडे लक्ष देत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.