आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिझेल, गॅस, केरोसीन आणखी महागण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि केरोसीनच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. डिझेलमध्ये प्रतिलिटर 3 ते 5 रुपयांपर्यंतच्या दरवाढीचा प्रस्ताव आहे. तसेच केरोसीनमध्ये 2 रुपये प्रतिलिटर आणि स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रति सिलिंडर 5 रुपयांपर्यंतची दरवाढ होऊ शकते.
वैद्यकीय तपासणीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सध्या अमेरिकेत गेल्या आहेत. त्या परतताच दरवाढीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता उच्चपदस्थ सरकारी अधिका-यांनी व्यक्त केली. एका अधिका-याने सांगितले की, हा राजकीय निर्णय आहे. काँग्रेसचा कोअर ग्रुप याबाबतीत सर्वात आधी निर्णय घेईल. यानंतर राजकीय मुद्द्यांसंदर्भातील कॅबिनेट समितीकडे दरवाढीवर अंतिम निर्णय घेणार आहे. रुपयाच्या अवमूल्यनामुळे नुकतेच पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली. डॉलरमुळे होणारे नुकसान मोठे असून त्याची भरपाई करण्यासाठी सरकारकडून आणखी दरवाढ केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.