आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Direcpay Now Fill Online, Times Of Money Option To Municipal Corporation

‘डायरेक्पे’चे ऑनलाइन कर भरणा केंद्र ,टाइम्स ऑफ मनीकडून महापालिकांसाठी पर्याय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऑनलाइन पैसे भरणे तसेच खरेदी करण्यास दिवसेंदिवस ग्राहक जास्त पसंती देऊ लागले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये भराव्या लागणा-या कराची रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरण्याची गरज निर्माण झाली आहे. हे लक्षात घेता ‘टाइम्स ऑफ मनी’ या आघाडीच्या कंपनीने ‘डायरेक्पे’ हा महानगरपालिकांसाठी ऑनलाइन कर भरण्यासाठी नवा सुलभ पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
कर भरणे हे ग्राहकांना बोजा वाटू नये या मानसिकतेतून ‘डायरेक्पे’ पर्याय विकसित करण्यात आला आहे. त्यातून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कर भरणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अशा प्रकारचे सोपे, साधे आणि झटपट पर्याय उपलब्ध करून दिले तर तो ग्राहक आणि महानगरपालिका या दोघांसाठीही उपयुक्त ठरू शकतो, असे मत डिजिटल पेमेंट क्षेत्रातील टाइम्स ऑफ मनीचे सीईओ अविजित नंदा यांनी व्यक्त केले.
‘डायरेक्पे’च्या तंत्राच्या वापरात गोव्याने आघाडी घेतली असून मडगाव महानगरपालिकेमध्ये त्याचा वापर सुरू झाला आहे. त्याच्याखालोखाल पणजी शहरात तसेच अन्य 12 महानगरपालिका व परिषदांमध्येही ‘डायरेक्पे’चा वापर
करण्यात येणार आहे. महाराष्‍ट्र सरकारलादेखील कर भरणासाठी त्याचा उपयोग होत आहे.
ग्राहकांचा फायदा
वेळेची बचत, लांबलचक रांगा किंवा मुदतीअंती भराव्या लागणा-या दंडापासून सुटका, आपली सोय, वेळेनुसार कोठूनही आणि कोणत्याही वेळी ठरलेल्या मुदतीत कर भरणा शक्य.
महापालिकांचा फायदा
दस्तऐवजांच्या कटकटीपासून मुक्तता, प्रशासनाला मनुष्यबळाचा अधिक प्रभावी वापर करणे शक्य, कराच्या माध्यमातून निधी संकलनाचे काम सोपे, जलद गतीने रक्कम प्राप्त करणे शक्य, ऑनलाइन पद्धतीमुळे महत्त्वाच्या माहितीचे संकलन, कर भरल्याची अचूक माहिती प्राप्त होते.