आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Direct Tax Collection Increased By 7.41 Percentage

प्रत्यक्ष करसंकलनात ७.४१ टक्के वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या काळात एकूण प्रत्यक्ष करसंकलन १२.९३ टक्क्यांनी वाढले आहे. करसंकलन ४.८४ लाख कोटींनी वाढून ५.४६ लाख कोटींवर पोहोचले आहे. मात्र रिफंडनंतर निव्वल करसंकलन ४.४८ लाख कोटी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात केवळ ७.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, जेटली यांनी ही वाढ चांगली असल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले, आर्थिक घडामोडींची गती जास्त नसतानाही ही वाढ झाली आहे. मुख्य समस्या रिफंडमधून आहे. यासाठी खूप रक्कम द्यावी लागत आहे. अप्रत्यक्ष कराबाबत काही क्षेत्रांतून चांगला महसूल मिळाला आहे.

मॅन्युफॅक्चरिंगसमोर मात्र आव्हान आहे. मात्र, दुस-या तिमाहीत एकंदरीत स्थिती सुधारली आहे. प्रत्यक्ष कराबाबत पूर्ण वर्षासाठी सरकारने १६ टक्के वाढीसह ७.३६ लाख कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे.