आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन रुपयांनी डिझेल भडकणार, रूपयाच्या अवमूल्यनाचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपयाच्या अवमूल्यनामुळे आयात महागली असून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना त्याचा फटका बसला आहे. विक्रीतील तोटा भरून काढण्यासाठी डिझेलच्या दरात एका टप्प्यातच तीन रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

केंद्राने डिझेल दरात महिन्याला 50 पैशांची वाढ करण्याची परवानगी कंपन्यांना दिली होती. त्यानुसार तेल कंपन्यांचा तोटा लिटरमागे 3 रुपयांपर्यंत कमी झाला होता. रुपयाच्या घसरणीमुळे आता तो लिटरमागे 10.22 रुपयांपर्यंत गेला आहे. दरवाढीची विनंती केंद्राकडे करण्यात आली आहे. सरकारच त्यावर निर्णय घेईल, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे संचालक पी.के. गोयल यांनी सांगितले.