आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Diseal Sell News In Marathi, Divya Marathi, Crude Oil,

डिझेल विक्रीवरील तोटा घटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आंतरराष्‍ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे व सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना बाजारभावापेक्षा कमी किमतीला डिझेल विक्री केल्यामुळे होणा-या तोट्याचे प्रमाणही कमी झाले आहे. डिझेल विक्रीवरील तोटा एक रुपयांपेक्षा जास्त-कमी होऊन तो आता लिटरमागे 7.16 रुपयांवर आला आहे.


मार्च महिन्याच्या दुस-या पंधरवड्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचा तोटा प्रत्येक लिटरमागे 7.16 रुपयांवर आला आहे. याच महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हा तोटा प्रती लिटर 8.37 रुपये होता, असे अधिकृत जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव बॅरलमागे घसरून तो 106.18 डॉलरवरून 105.36 डॉलरवर आला आहे. केवळ कच्च्या तेलाचे भाव कमी झाले म्हणूनच नाही तर स्थानिक कर किंवा व्हॅट वगळता या कंपन्यांना डिझेलच्या दरात मासिक 50 पैशाने वाढ करण्यास परवानगी दिल्याचादेखील हा परिणाम आहे. मागील वर्षाच्या जानेवारीपासून डिझेलचा भाव 8.33 रुपये लिटरपर्यंत गेला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील या कंपन्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनच्या विक्रीवर 36.34 रुपये लिटर असा तोटा होत आहे. स्वयंपाकाच्या गॅस विक्रीवरील तोटा कमी झाला असून तो प्रती 14.5 किलोच्या सिलिंडरसाठी 655.96 रुपयांवरून (फेब्रुवारी) आता 605.80 रुपयांवर आला आहे.