आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Disel And Lpg Gas Rate Increase Soon Petrolium Minister

डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर लवकरच वाढणार ; पेट्रोलियम मंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डिझेल तसेच स्वयंपाकाच्या गॅसचे भाव वाढवण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत असून लवकरच निर्णय होईल, असे पेट्रोलियम मंत्री एम. वीरप्पा यांनी व्यक्त केले.

त्यांनी सांगितले, दरवाढ असो की दरकपात प्रस्तावाचा चेंडू आता कॅबिनेटच्या कोर्टात आहे. अजून त्यावर निर्णय झालेला नाही. डिझेल, घरगुती गॅस, रॉकेलच्या किमती वाढवण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. इंधनाच्या किमती निर्धारित करण्यासाठी नेमलेल्या विजय केळकर समितीचा प्रस्तावही तेल मंत्रालयाने कॅबिनेटकडे पाठवला आहे. समितीने प्रस्तावात अनेक शिफारशी सुचवल्या आहेत. त्यावर सरकारचा विचार सुरू आहे. डिझेल, रॉकेल तसेच गॅस विक्रीत तेल कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागत असल्याचा पुनरुच्चार मोईली यांनी केला.

दरवाढीची शिफारस
केळकर समितीने इंधन दरवाढीची शिफारस केली आहे. डिझेलच्या किमती लिटरमागे 4 रुपयांनी, रॉकेलच्या किमती लिटरमागे दोन रुपयांनी वाढवण्याची शिफारस समितीने केली आहे. घरगुती गॅसच्या किमती सिलिंडरमागे 50 रुपयांनी वाढवाव्यात, असे समितीने सुचवले आहे.

कंपन्यांचा तोटा
सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरक कंपन्यांना डिझेलच्या विक्रीत लिटरमागे 10.16 रुपये नुकसान सहन करावे लागते. रॉकेलच्या विक्रीत लिटरमागे 32.17 रुपये, तर एलपीजीच्या एका सिलिंडरच्या विक्रीपोटी 490.50 रुपये तोटा सहन करावा लागत आहे.