आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- महिलांसाठी खास व्यवहार कक्ष अशी सुविधा प्रथमच देणारे दिशा फायनान्स या गुंतवणूक सल्ला सेवा क्षेत्रातील कंपनीचे येथील मयुर कॉलनी परिसरात नवे कार्यालय सुरु झाले आहे. संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
कंपनीचे कार्यकारी संचालक सुहास राजदेरकर म्हणाले की, मुंबई आणि कोल्हापूर येथेही आमच्या शाखा असून मुदत ठेवी, करमुक्त रोखे, विमा या पारंपरिक साधनाप्रमाणे रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीचा पर्याय आम्ही देणार आहोत. समाजातील महिला गुंतवणूक दार वेगाने वाढत आहेत. हे लक्षात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी खास सुविधा देत आहोत. त्यासाठी महीला बोल्ट ऑपरेटर नियुक्त केला जाणार आहे. नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. एमबीए विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आगामी काळात जळगाव, सोलापूर येथे नव्या शाखा आणि संपत्ती, मालमता व्यवस्थापन सेवा देण्याचा आमची योजना आहे असे त्यांनी नमूद केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.