आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजाराची धूम तारणार, आता तेजीवर साधणार निर्गुंतवणुकीचे लक्ष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- येत्यादोन ते तीन महिन्यांत निर्गुंतवणुकीचा कार्यक्रम राबवून अर्थसंकल्पातील ५८,४२५ कोटींचे लक्ष्य साधणार असल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.

अर्थसंकल्पात देण्यात आलेले उद्दिष्ट निश्चितच पूर्ण करू, असा विश्वास अर्थसचिव अरविंद मायाराम यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, अर्थसंकल्पात देण्यात आलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त आकडा गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार आहेत. येत्या दोन-तीन महिन्यांत निर्गुंतवणुकीचा कार्यक्रम राबवून त्याद्वारे उद्दिष्ट गाठण्याची तयारी मंत्रालयाने चालवली आहे. यात प्रामुख्याने सार्वजनिक बँकांतील हिस्सेदारी कमी करण्यात येईल. शेअर बाजारातील तेजीमुळे या निर्गुंतवणुकीला चांगली चालना मिळणार असल्याकडे मायाराम यांनी लक्ष वेधले.निर्गुंतवणुकीसाठी अर्थसंकल्पात ५८,४२५ कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले असून यात सार्वजनिक बँकांतील हिस्सा कपातीच्या ४३,४२५ कोटी रुपयांचा समावेश आहे. तर इतर सार्वजनिक कंपन्यांतील हिस्सा विक्रीतून १५,००० कोटी उभे करण्याची योजना आहे.

यातहोणार निर्गुंतवणूक : ज्याकंपन्यांतील हिस्सा सरकार कमी करणार आहे त्यात ओएनजीसी, कोल इंडिया, सेल, एनएचपीसी, आरआयएनएल, आरईसी आणि पीएफसी यांचा समावेश आहे.
वृत्तसंस्था

निर्गुंतवणुकीचेलक्ष्य साधण्यासाठी शेअर बाजारातील तेजी चांगली पोषक ठरणार असल्याचे मायाराम यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षात शेअर बाजाराने आतापर्यंत २० टक्के वाढ दर्शवली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साधण्यास उपयोगी ठरणार असल्याने हे लक्ष्य पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.